ताज्या बातम्यानांदेडनायगांव

गणपती विसर्जन मिरवणुकीत धारधार शस्त्राने हल्ला प्रकरणी तिघांच्या विरोधात गुन्हा नोंद

New Bharat Times नेटवर्क

नायगाव : गणपती विसर्जन मिरवणुकीत धारधार शस्त्राने हल्ला करुन पांडुरंग केशव चव्हाण यांना गंभीर जखमी करण्यात आले होते. सदर प्रकरणी नायगाव पोलीस ठाण्यात तिघांच्या विरोधात अखेर गुन्हा नोंद करण्यात आला असून. या प्रकरणातील दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या आव्हानाला प्रतिसाद देत नायगाव तालुक्यातील गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी डि जे मुक्त वातावरणात गणपतीचे विसर्जन केले. असले तरी नायगाव शहरात काहीही दारुच्या नशेत धुडगूस घातल्याचे दिसून आले. विशेषतः गणपती विसर्जनाची मिरवणूक सुरु असताना दि. 6 सप्टेंबर च्या रात्री 10 वाजताच्या दरम्यान लालवंडी रोड जवळ अचानक एकाहींनी पांडुरंग केशव चव्हाण यांच्यावर धारधार शस्त्राने पोटावर व छातीवर हल्ला केला. हल्लेखोर तत्काळ पळून गेले. त्यामुळे शहरात वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले.

गणपती विसर्जनाची मिरवणूकी दरम्यान कडेकोट पोलीस बंदोबस्त असताना हल्ला झाल्ला झाल्याने पोलीसांच्या बंदोबस्ताबाबत शंका उपस्थित करण्यात येत आहे. धारधार शस्त्राच्या हल्यात गंभीर जखमी झालेल्या पांडुरंग चव्हाण यास तातडीने नांदेडला उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारानंतर काल.दि. 9 सप्टेंबर रोजी पांडुरंग केशव चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रवी धोंडीबा देवकांबळे, चंद्रकांत उर्फ चिकू जेजेराव भालेराव व संदीप धोंडीबा देवकांबळे या तिघांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला.

गुन्हा नोंद झाल्यनंतर या प्रकरणातील दोन आरोपींना नायगाव पोलिसांनी अटक केली आहे.

नायगाव पोलीस ठाण्याच्या निष्क्रिय ठाणेदारामुळे परिसरात अवैध धंदे बोकाळले असून या अवैध धंद्यामुळे गुन्हेगारीत वाढ होत असून 20 ते 25 वर्षें वयातील तरुण गुन्हेगारीकडे वळत आहेत.

जखमीची प्रकृती स्थिर…
तक्रारदार पांडुरंग चव्हाण यांच्यावर दि. 8 सप्टेंबर रोजी शस्त्रक्रिया झाली असून त्यांची प्रकृती स्थीर असल्याची माहिती मिळाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker