ताज्या बातम्यानांदेडबिलोली

कुंडलवाडी शहरात ईद-ए-मिलाद उन नबी उत्साहात साजरी ◆कुंडलवाडी पोलीसांचा चोख बंदोबस्त

अंकुशकुमार देगावकर

कुंडलवाडी :- मुस्लीम समाजाचे धर्मगुरु हजरत मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस कुंडलवाडी शहरात दि.१० सप्टेंबर रोजी उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी मुस्लिम समाज बांधवांनी ईद-ए- मिलाद निमित्त शहरातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली.

मुस्लिम बांधवांमध्ये हजरत महंमद पैगंबर यांच्या जयंतीला विशेष महत्त्व आहे.गणेशोत्सव काळातच ५ सप्टेंबर रोजी ईद-ए- मिलाद हा सण आल्यामुळे पोलिस प्रशासनाने शहरातील मुस्लिम समाज बांधवाची बैठक घेतली होती. या बैठकीत मुस्लिम समाज बांधवांनी पोलीसांच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत ईद-ए-मिलाद सण १० सप्टेंबर रोजी साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बांधवांनी गत काही दिवसांपासूनच मिरवणुकीची तयारी केली होती.

यानुसार शहरात मोहमंद पैगंबर यांच्या जन्मदिवसानिमित्त मुनवर मस्जिद पासुन शहरातील प्रमुख मार्गावरून वाजत गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी ठिकठिकाणी मिरवणुकीचे स्वागत करून मुस्लिम समाज बांधवांना खाऊ, शरबत चे वाटप करण्यात आले. शहरातील मस्जिदवर आकर्षक रोषनाई करण्यात आली होती. तसेच विविध धार्मिक कार्यक्रम व उपक्रमही राबविण्यात आले.

यावेळी वसीम हाफीजसाब, मुस्ताख हाफीजसाब, यासीन हाफीजसाब, नवाब मौलीसाब, माजीद हाफीजसाब, अब्बु हाफीजसाब या मुस्लिम धर्मगुरू उपस्थित होते. मुनवर मस्जिद सदर नजीर भाई उपस्थित होते. मिरवणुकीचा समारोप मुनवर मस्जिद येथे करण्यात आले. यानंतर स्नेहभोजनाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आले.

यावेळी ईद-ए-मिलाद-उन- नबी कमिटीचे अध्यक्ष मैनोद्दीन मगदुमसाब शेख, उपाध्यक्ष हाजी इब्राहिम शेठ खाजामियाँ, मुख्तार खाजामियाँ शेख, आमेर शेख, आजीम खाजामियाँ शेख, महम्मद अफजल, शेख अफजल क्रिकेटर, महम्मद बागवान, मन्सूर अली सुजात अली, खाजासेठ, नसीम खाजी, रफीक शेख, बासीद शेख, रियाज पठाण, माजीद शेख, म़ोईन बाबुभाई यांच्यासह शहरातील मुस्लिम समाज बांधव, लहान मुले, तरूण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी कुंडलवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे, पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र मांजरमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस, गृहरक्षक दलाचे जवान व राज्य राखीव दलाच्या जवानांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker