ताज्या बातम्यानांदेडबिलोली

रामतीर्थच्या समाधान शिबिरास दांडी मारणाऱ्या विरुद्ध कारवाई व दुसऱ्यांदा समाधान शिबिराचा बिलोलीच्या तहसीलदारांनाही पडला विसर ?

मोरे मनोहर

किनाळा :- रामतीर्थ येथे छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान अभियाना अंतर्गत शनिवार दि.१४ मार्च रोजी आयोजित करण्यात आलेल्या समाधान शिबिरास नेमण्यात आलेल्या 26 अधिकाऱ्यांपैकी अर्धेअधिकारीच गैरहजर असल्याने शिबिराचा चांगलाच फज्जा उडाला होता यामुळे शिबिरास गैरहजर असणाऱ्या अधिकाऱ्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करून जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी हे दुसऱ्यांदा म्हणजेच येत्या शनिवारी 21 मार्च रोजी समाधान शिबिर घेतले जाईल असे बिलोली येथील तहसीलदार गजानन शिंदे यांनी उपस्थित ग्रामस्थांना आश्वासन दिले होते मात्र त्यांनाही या शिबिराचा आता विसर पडला की काय असा प्रश्न अनेक नागरिकांना पडला आहे.

रामतीर्थ तालुका बिलोली येथील जवाहर नवोदय विद्यालय दिनांक 14 मार्च रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ६ वाजेप्यंत समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते मात्र या शिबीर सुरू होताच अनेक विभागांचे अधिकारी गैरहजर असल्याचे समोर आल्याने या शिबिराच्या सुरुवातीलाचतक्रारदार किनाळा येथील सरपंच विठ्ठल माने यांनी सर्व २६ विभागांच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती तपासण्याची मागणी केली. त्यानुसार एकेक अधिकाऱ्यांची हजेरी घेतली असता अनेक अधिकारीच गैरहजर असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे उपस्थित नागरिकांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत आणि शिबिराचा उद्देशच फोल ठरल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

शासन आपल्या दारी या संकल्पनेतून नागरिकांच्या समस्या त्यांच्या दारी सोडवण्यासाठी हे शिबिर आयोजित करण्यात आले होते. मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या प्रमाणात गैरहजर राहिले होते यामुळे वेगवेगळ्या गावातून आपल्या वेगवेगळ्या समस्या घेऊन आलेल्या नागरिकांना निराशा सहन करावे लागले.
या शिबिरासाठी किनाळा येथील सरपंच विठ्ठल माने, बाबाराव पाटील, हणमंत पाचाळ, जिगळा येथील जाधव, रामतीर्थ येथील कांबळे यांच्यासह परिसरातील काही ज्येष्ठ महिला आणि नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या. मात्र जागेवरच कोणाचेही समाधान न झाल्याने त्यांनाही निराश होऊन घरी परतावे लागले.

दरम्यान अध्यक्षीय समारोप करताना तहसीलदार गजानन शिंदे यांनी सांगितले की छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानांतर्गत आलेल्या सर्व तक्रारींचे निराकरण करण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत असुन या शिबिरासाठी जे नेमन्यात आलेले कर्मचारी या आयोजित करण्यात आलेल्या शिबिरास गैरहजर राहिले आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल व या भागातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी दुसऱ्यांदाम्हणजेच येत्या शनिवारी 21 मार्च रोजी पुन्हा समाधान शिबिर आयोजित करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.

शासनाने सुरू केलेल्या समाधान शिबिराच्या माध्यमातून सामान्य जनतेचे समाधान अधिकाऱ्याकडून केले जात नसेल तर महापुरुषांच्या नावाला हा कलंक असून अशा ह्या महापुरुषांच्या नावाने सुरू करण्यात आलेल्या शिबिरास गैरहजर असणाऱ्या कर्मचाऱ्यावर तात्काळ कारवाई करून सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी शासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न करावे अन्यथा असे शिबिर घेणे बंद करावे असाही सणसणीत इशारा यावेळी किनाळा येथील सरपंच विठ्ठल माने यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले होते.

ग्रामीण भागातील सामान्य जनतेचे प्रश्न सुटावे या दूरदृष्टी कोणातून रामतीर्थ येते 14 मार्च रोजी आयोजित करण्यात आलेले समाधान शिबिर यशस्वी व्हावे यासाठी महसूल विभागाच्या मंडळ अधिकारी कल्पना मुंडकर तलाठी विजय पाटील जाधव आणि तलाठी प्रणिता काळे यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले मात्र या शिबिराकडे अधिकाऱ्यानेच पाठ फिरवल्याने या शिबिराचा फज्जा उडाला होता मात्र तहसीलदार गजानन शिंदे यांनी दुसऱ्यांदा शिबिराचे आयोजन करून सामान्य जनतेचे प्रश्न सोडवतील अशी आशा अनेकांना होती मात्र त्यांनाही आता विसर पडल्याने काचुकार अधिकाऱ्यावर कारवाई करणे तर दूरचराहिले परंतु जनतेचे प्रश्न समजून घेण्यासाठी सुद्धा तहसीलदारांचेही दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker