गावाकडच्या बातम्यानांदेडबिलोली

किनाळा ग्रामसभेत अवैध दारू विक्री बंदचा ठराव

मोरे मनोहर

किनाळा :- किनाळा तालुका बिलोली येथे गेल्या अनेक वर्षापासून अवैध दारू विक्री चालू असल्याने गावातील मोठ्या प्रमाणात महिला एकत्र येऊन गावात होणारी अवैध दारू विक्री बंद करण्याची मागणी 17 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या ग्रामसभेत केल्याने या ग्रामसभेत सरपंच विठ्ठल माने यांच्या नेतृत्वाखाली गावातील अवैध दारू विक्री बंद करण्याचा सर्वानुमते ठराव घेण्यात आला असून या ठरावाची एक प्रत येथील महिलांनी रामतीर्थ पोलीस ठाण्यात दिली आहे.

नांदेड देगलूर राज्य महामार्गावर असलेल्या किनाळा तालुका बिलोली येथे गेल्या अनेक वर्षापासून बेकायदेशीर रित्या गावातीलच काही व्यक्ती मोठ्या प्रमाणात अवैध देशी दारू विक्री करत असल्याने गावातील अनेक तरुण मुले व्यसनाच्या आहारी गेले तर कित्येक नागरिकांचे दारूमुळे संसाराचे वाटोळे झाले, अनेक कुटुंबात दारू पिण्यासाठी महिलेने विरोध केला तर तिला मारहाण करून चक्क तिच्याच अंगावरील दागिने विकून अनेक जण दारू पिऊन घरी येत असतात अशा गावात दारू पिऊन गावात व घरात गोंधळ घालणाऱ्या तरुणांना वाटणीवर आणण्यासाठी गावातील महिला एकत्र येऊन गावात होणारी अवैध दारू विक्री बंद करण्यासाठी ग्रामपंचायतीने 17 सप्टेंबर रोजी आयोजित केलेल्या ग्रामसभेत निवेदन देत गावातील अवैध दारू विक्री बंद झालीच पाहिजे अशी ठाम भूमिका मांडले.

17 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या ग्रामसभेत मोठ्या प्रमाणात महिला एकत्र येऊन गावातील अवैध दारू विक्री बंद करण्याची जी मागणी केली त्याबद्दल ग्रामसभेस उपस्थित असलेल्या सर्व महिलांचे सरपंच विठ्ठल माने यांनी अभिनंदन करून गावात यापुढे कोणीही दारू विक्री करू नये जर कोणी अवैध दारू विक्री करताना आढळून आल्यास त्यांच्या विरुद्ध योग्य ती ग्रामपंचायत स्तरावरून कारवाई करण्यात येईल असा ठराव घेण्यात येत असल्याचे घोषित करून महिलांनी घेतलेल्या निर्णयास सर्व गावकऱ्यांनी सहकार्य करावे अशी विनंती करून दारू विक्रेत्यांनाही यापुढे दारू विक्री करू नये अशा सूचना देण्यात आल्या असून ग्रामपंचायतीने घेतलेल्या दारूबंदीच्या ठरावाची प्रत रामतीर्थ पोलीस ठाण्यात महिलांनी दिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker