ताज्या बातम्यानांदेडबिलोली

कुंडलवाडी सोसायटीच्या सर्वांगिण विकासासाठी यापुढेही प्रयत्नशील राहणार ◆ १३ लाख १६ हजार ९९७ रुपयांचा नफा

◆ जलसिंचन उपसा जलसिंचन योजनेचे कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण केले ◆शेतकरी सभासदांचा सातबारा कोरा करण्याची प्रक्रिया सुरू ◆चेअरमन सुनील बेजगमवार

कुंडलवाडी :- कुंडलवाडी सोसायटीस ३१ मार्च २०२५ अखेर १३ लाख १६ हजार ९९७ रुपयांचा नफा झाला आहे.सोसायटी निवडणुकीत शेतकरी सभासद मतदाराला दिलेले उपसा जलसिंचन योजनेच्या कर्जमाफीचे आश्वासन पूर्णत्वास नेले असून शेतकऱ्यांच्या सातबा-यावरील कर्जाचा बोजा काढण्याचे काम प्रशासनाकडून सुरू असून शेतकरी सभासदाचा सातबारा लवकरच कोरा होणार आहे. सोसायटीच्या सर्वांगीण विकासासाठी यापुढेही सदैव प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन सोसायटीचे चेअरमन सुनील बेजगमवार यांनी दि.१६ सप्टेंबर रोजी सोसायटीच्या प्रांगणात आयोजित ६९ व्या सर्वसाधारण वार्षिक सभेत अध्यक्षीय समारोप करताना केले.

ते पुढे म्हणाले की, सोसायटीचा पदभार स्वीकारून अडीच वर्ष झाले. शेतकऱ्यांसाठी या अडीच वर्षात पिक विमा मोफत भरण्यात आले. शेतकऱ्यांसाठी जेनेरिक मेडिकल सुरू करण्यात आले. सोसायटीकडून शेतकरी सभासदांच्या शेतीमाल ठेवण्यासाठी १ कोटी २५ लाख रुपयांचा गोडाऊन उभारणीचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून आगामी काळात तारण कर्ज सेवा ही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. शेतीनिष्ठ पुरस्कार सुरू करण्याबरोबरच शेतकरी सभासदाच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. सोसायटीकडून सुविधा केंद्र लवकरच सुरू करण्यात येणार असून या शासनाकडून सुविधा केंद्र सुरू करण्यास मान्यता मिळाली आहे.

सोसायटीचे कामकाज संगणकीकरण करण्यात येणार आहे. तसेच उपसा जलसिंचन योजनेच्या कर्जमाफीसाठी शासन दरबारी वेळोवेळी पाठपुरावा करून निवडणुकीत दिलेले उपसा जलसिंचन योजनेची कर्जमाफी करण्याचे आश्वासन पूर्ण केले असून प्रशासनाकडून कर्जदार उपसा जलसिचन योजनेच्या कर्जदार शेतकऱ्यांच्या सातबा-या वरील कर्जाचा बोजा काढण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे कर्जदार असलेल्या शेतकरी सभासदाचा सातबारा कोरा होणार आहे असे चेअरमन सुनील बेजगमवार यांनी सांगितले.

सभेच्या सुरूवातीस संस्थापक चेअरमन माजी आमदार जयराम अंबेकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार टाकुन अभिवादन करण्यात आले. तसेच संस्थेच्या दिवगंत चेअरमन यांच्या प्रतिमेचे पुजन करून दिपप्रज्वलन करण्यात आले. व सोसायटीचे दिवंगत शेतकरी सभासद यांना श्रद्धांजली अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. ३१ मार्च २०२४ अखेर २६८७ एवढी होती. तर या वर्षात संस्थेच्या सभासद संख्येत २५१ ने वाढ होत ३१ मार्च २०२५ अखेर २९३८ इतकी सभासद संख्या झाली.
यावेळी उद्योजक मारोतराव कवळे गुरुजी, माजी चेअरमन साईनाथ उत्तरवार, संजय पाटील शेळगावकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमास सोसायटीचे व्हाईस चेअरमन गंगाधर नरावाड, संचालक प्रकाश अर्जुने, गंगाधरराव खेळगे, हणमलू कोटलावार, गणपत पाटील टेकाळे, संजय गंगोणे, माधवराव पाटील, धुरपतबाई गट्टूवार, प्रसुधाबाई जोगदंड, दत्ता कोमुलवार, मनोहर पाटील रामपुरे यांच्यासह माजी चेअरमन, माजी संचालक सह सोसायटीचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. अहवालाचे वाचन मँनेजर रामराव रत्नागिरे यांनी केले. तर प्रास्ताविक संचालक प्रकाश अर्जुने यांनी केले. वार्षिक सभेचा समारोप स्नेह भोजनाने करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker