ताज्या बातम्याधर्माबादनांदेड

उपसा जलसिंचन योजनेअंतर्गत असलेल्या शेतकरी सभासदाच्या सातबा-याावरील कर्जाचा बोजा काढण्यासाठी कुंडलवाडी सोसायटीतर्फे धर्माबाद तहसीलदारांना पत्र

कुंडलवाडी :- कुंडलवाडी सोसायटीच्या कार्यक्षेत्रात असलेल्या माष्टी, पाटोदा (थडी), शेळगाव (थडी) व चेन्नापूर या गावातील उपसा योजनेअंतर्गत असलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जाचा बोजा काढण्यासाठी कुंडलवाडी येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी चे चेअरमन सुनील बेजगमवार यांच्या शिष्टमंडळाने धर्माबाद च्या तहसीलदार सुरेखा स्वामी यांची दि.१७ सप्टेंबर रोजी भेट घेऊन उपसा जलसिंचन योजनेच्या कर्जाचा बोजा सातबारा वरून काढण्यासाठी सोसायटीतर्फे पत्र देण्यात आले. यावेळी व्हाँईस चेअरमन गंगाधर नरावाड, संचालक संजय गंगोणे, बालाजी पाटील जोगदंड आदी जण यावेळी उपस्थित होते.

यावेळी तहसीलदार सुरेखा स्वामी यांनी लवकरच शेळगाव (थडी), माष्टी पाटोदा (थडी), चेन्नापूर गावातील उपसा जलसिंचन योजनेच्या अंतर्गत असलेल्या शेतकऱ्यांच्या सातबारा वरील कर्जाचा बोजा कमी तलाठी यांच्यामार्फत लवकरच कार्यवाही करु असे असे यावेळी सोसायटीच्या शिष्टमंडळाला दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker