ताज्या बातम्यानांदेडमहाराष्ट्र

होमगार्डचे केंद्र नायक संतोष जैस्वाल यांचा पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते सन्मान

प्रकाश कांबळे

नांदेड :- पुरपस्थितीमुळे जिल्ह्यात सर्वत्र हाहाकार माजला असताना आपत्ती निवारणासाठी नांदेड जिल्ह्यातील होमगार्डची टीम सुद्धा तत्परतेने धाऊन गेली. त्यांनी जवळपास ७० नागरिकांना पुरातून बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी हलविले होते. या उल्लेखनीय बद्दल पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते होमगार्डचे केंद्र नायक संतोष जैस्वाल प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हा नियोजन भवनाच्या सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमास माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण, खा.अजित गोपझडे, आ.तुषार राठोड, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार,मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली,अप्पर पोलीस अधीक्षक तथा होमगार्ड जिल्हा समादेशक सुरज गुरव त्यांच्यासह जिल्हा प्रशासनातील प्रमुख अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

अप्पर पोलीस अधीक्षक,नांदेड तथा होमगार्डचे जिल्हा समादेशक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली
दोन अधिकारी व ९ होमगार्ड जवान यांच्या टिमने स्वतःच्या जीवाची बाजी लावत हुनगुंदा व संगम मनूर येथे जाऊन पुरात अडकलेल्या जवळपास ७० नागरिकांना बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी हलविले होते. या टिममध्ये केंद्र नायक संतोष जैस्वाल यांच्यासह वरिष्ठ पलटन नायक बशिरोद्दीन शेख, होमगार्ड जवान सय्यद इम्रान अली, शेख फेरोज शेख इमाम, माधव कोमटवार, बालाजी गवंडेल, मादास हिवरे, शिवाजी कोकरे, प्रभाकर कोमटवार, पृथ्वीराज कंधारे व हनुमान घोडके यांचा समावेश होता. या सर्वांचा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने प्रशस्तीपत्र देऊन सन्मान केला आहे. या सर्वांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker