गावाकडच्या बातम्यानांदेडलोहा

जोमेगाव येथील आशा स्वंयसेवीकेचे पद चार वर्षापासून रिक्त असल्यामुळे महिलांचे आरोग्य आले धोक्यात…

बालासाहेब शिंदे

मारतळा :- शासनाने ग्रामीण भागातील महिलांचे आरोग्य सुधारण्यासाठी प्रत्येक गावात आशा स्वंयसेवीकेची निवड केली असून लोकसंख्येच्या प्रमाणात या पदांची निर्मिती करण्यात आली असून लहान गावांसाठी एका तर मोठ्या गावांसाठी पद वाढवून देण्यात येते आशा स्वंयसेवीकेचे मुख्य काम गावातील महिलांचे आरोग्यमान उंचावण्यासाठी काम करणे, गरोदर मातांच्या आरोग्याची काळजी घेणे, लसीकरण, कुमारिकाना आरोग्य विषयी जागृत करणे.

संसर्गजन्य रोगांचा प्रसार रोखण्यासाठी गावस्तरावर काम करणे, जन्म मृत्यूच्या नोंदी घेणे आदी महत्वाच्या जबाबदाऱ्या त्यांना देण्यात आल्या आहेत पण लोहा तालुक्यातील जोमेगाव येथील आशा सेविकेचे पद हे प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे मागील मागील चार वर्षांपासून रिक्त असल्यामुळे महिलांसह लहान बालके किशोरवयीन मुलींचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे या प्रकाराची चौकशी करून येथील सेविकेचे पद तात्काळ भरावे महिलांचे होणारे हाल थांबवावे अशी मागणी होत आहे.

जोमेगाव ता.लोहा येथील आशा सेविकीचे चार वर्षापूर्वी निधन झाले तेव्हा पासून हे पद प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे रिक्त आहे त्यामुळे गावातील महिलांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या पदाची निवड करण्यासाठी आरोग्य विभागाकडून दोन वेळा जाहीर प्रगटन काढण्यात आले व ग्रामपंचायतीने ग्रामसभा घेऊन आशा सेविकेची निवड करण्यासाठी कळवण्यात आले होते पण ग्रामपंचायती कडून दोन्ही वेळा किमान पात्रता नसणाऱ्या महिलेचीच निवड करून ठराव पाठवण्यात आला त्यामुळे ही निवड प्रकिया मागील चार वर्षा पासून खोळंबलेली आहे गावात इतर पात्रता धारक उमेदवार असताना देखील आरोग्य विभाकडून त्यांची निवड का केल्या जात नाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

इतक्या दिवसाचा कालावधी लोटूनही अद्यापही आशा स्वंयसेवीकेची निवड होत नसल्यामुळे गावातील महिलांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून त्यांचे आरोग्य बिघडत चालले आहे गावात रोगराईमुळे संसर्गजन्य रोगांचा फैलाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे त्यामुळे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची त्वरित दखल घेऊन येथील आशा सेविकीची निवड तात्काळ करावी अशी मागणी गावातील नागरिकांच्या वतीने करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या गावासाठी ग्रामपंचायत अधिकारी म्हणून एक महिलाच पदावर असताना याबाबींकडे त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे महिलांच्या आरोग्याच्या बाबतीत महिला अधिकारी देखिल गंभीर नसल्याचे दिसून येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker