ताज्या बातम्यानांदेडमहाराष्ट्र

नांदेडच्या शैक्षणिक क्षेत्रात तरोड्यातील केअर कॉम्पुटर एज्युकेशनची भरारी !

देशपातळीवर पहिल्या शंभरात ; राष्ट्रीय गौरव पुरस्काराने सलग चौथ्यांदा सन्मान

New Bharat Times नेटवर्क

नांदेड :- संगणकयुगात देशपातळीवर पहिल्या शंभर केंद्रात येण्याचा बहुमान मिळवित तरोडा (बु.) नांदेड येथील केअर कॉम्पुटर एज्युकेशन सेंटरने नांदेडच्या शैक्षणिक क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली असून संचालक अमित अशोकराव रामगिरवार व संचालिका अंतरा अमित रामगिरवार यांना राष्ट्रीय गौरव पुरस्काराने सलग चौथ्यांदा सन्मान मिळाला आहे.

नागपूर येथे नुकताच इंडिया एज्युकेशन अवार्ड – २०२५ हा सोहळा पार पडला. सुप्रसिध्द सिनेअभिनेत्री व मिस इंडिया वर्ल्ड- २००४ किताबाची मानकरी सायली भगत तसेच,ए. आय.सी.पी.इ.चे संचालक शरद तावरी व कविता तावरी यांच्या हस्ते देशपातळीवरील पहिल्या शंभर संगणक प्रशिक्षण केंद्रांना इंडियाज टाॅप १०० इन्स्टिटय़ुट पुरस्कार प्रदान करण्यात आला असून त्यात तरोड्यातील केअर काॅम्पूटर सेंटरचा समावेश आहे.

केअर कॉम्पुटर एज्युकेशनने २०१२ पासून नांदेडच्या शैक्षणिक क्षेत्रात भरीव योगदान देत असून, सलग चौथ्यांदा या प्रतिष्ठीत राष्ट्रीय पुरस्काराचा मान मिळवणे हि अत्यंत अभिमानास्पद बाब ठरली आहे. या अकॅडमीत व्यवसायाभिमुख व रोजगाराभिमुख संगणक अभ्यासक्रम राबवले जातात. त्यात टॅली प्राईम,डाटा एन्ट्री ऑपरेटर, सी.सी.सी., कॉम्पुटर टायपिंग,एॅडव्हास एक्सल आदींसारख्या कोर्सेस (अभ्यासक्रम)चा समावेश आहे. ग्रामीण व शहरी भागातील शेकडो विद्यार्थ्यांना प्रॅक्टीकल व अत्याधुनिक पध्दतीने प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगारक्षम बनवण्याचे काम या संस्थेतर्फे केले जात आहे.

त्याचबरोबर, बहुजन व सर्वच समाजघटकांतील आर्थिकदृष्ट्या मागास गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना माफक व अत्यल्प शुल्कात येथे प्रशिक्षण दिले जाते. आजपर्यंत दिल्या जाणाऱ्या उत्कृष्ट व गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या बळावर केअर कॉम्पुटर एज्युकेशनने विद्यार्थी व पालकांच्या मनात वेगळी ओळख निर्माण केली असल्याने उपस्थित सर्व मान्यवरांनी अमित अशोकराव रामगिरवार यांचा सन्मान करताना त्यांचे कौतुक व अभिनंदन केले.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर आपल्या भावना व्यक्त करताना अमित रामगिरवार म्हणाले की, हा सन्मान माझ्या वैयक्तिक कार्याचा नसून नांदेड शहराचा आणि येथे शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांचा आहे. पुरस्कार स्वीकारल्यावर त्यांचे आई – वडील शिक्षकवृंद, विद्यार्थी, पालकांचे व मित्रपरिवाराचे आभार त्यांनी व्यक्त केले. शिक्षणाच्या माध्यमातून समाजात सकारात्मक बदल घडवण्याचा माझा यापूढेही नेहमीच प्रयत्न राहील असेही अभिवचन त्यांनी यावेळी दिले.

देशपातळीवरील पहिल्या शंभर संगणक प्रशिक्षण केंद्रात येण्याच्या केअर काॅम्पूटर सेंटरच्या गौरवामुळे नांदेडच्या शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून स्थानिक नागरिक, विद्यार्थी व पालकांत अभिमानाची भावना व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker