ताज्या बातम्यानांदेडनायगांव

नायगाव शहरातील 724 पुरग्रस्त नागरीक मदतीपासून वंचित : यादीतील त्रुटीमुळे मदत लांबली

अंकुशकुमार देगावकर

नायगाव : आँगष्ट महिण्यातील अतिवृष्टीमुळे नायगाव शहरातील घरादारात पाणीच पाणी झाले होते. या पुरग्रस्त नागरिकांचा ज्या यंत्रणेने पंचनामा व सर्वेक्षण केले त्यांनी घर क्रमांकासह अनेक प्रकारच्या चुका केल्यामुळे शहरातील जवळपास 724 पुरग्रस्त नागरिकांची मदत रखडली आहे.

आँगष्ट महिण्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नायगाव तालुक्यातील घराघरात पुराचे पाणी गेले, काहींची अंशतः घरे पडली तर नायगाव शहरातून वाहणाऱ्या नदीला आलेल्या महापूरामुळे शहरातील सखल घरात पुराचे पाणी गेल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचे मोठ्या प्रमाणात तर नुकसान झालेच पण यामुळे अनेकांचा संसार उघड्यावर पडला. तालुक्यातील पुरग्रस्त भागाचे महसूल व नायगाव शहरातील नगरपंचायतच्या वतीने पंचनामे करुन तहसील कार्यालयात अहवाल सादर करण्यात आला. यात तालुक्यातील तब्बल 2100 नागरिकांचे नुकसान झाले होते. ग्रामीण भागातील जवळपास 1400 नागरिकांना मदत देण्यात आली असून. नायगाव शहरातील 724 पुरग्रस्त नागरिकांना अद्याप मदत मिळाली नाही.

नायगाव तालुक्यातील पुरग्रस्त व घरांचे नुकसान झालेल्यांना तातडीने पंचनामे करुन नुन भरपाई देण्याला तहसीलदारांनी प्राधान्य दिले होते. त्यामुळे ग्रामीण भागातील 1400 च्या वर नागरिकांना लाभ मिळाला परंतु नायगाव शहरातील पुरग्रस्त नागरिकांना एक महिण्याच्या नंतरही मदत मिळाली नाही. दसऱ्याच्या अगोदर मदत देण्याची तयारी करणाऱ्या महसूल विभागाने दसरा संपला तरी नायगाव शहरातील 724 पुरग्रस्त नागरिकांना अद्याप मदत दिली नाही.

नायगाव शहरातील पुरग्रस्त नागरिकांच्या याद्या तयार करतांना असंख्य नागरिकांच्या घरांना मालमत्ता क्रमांक दिलेला नाही, कुणाचे खाते क्रमांक चुकीचे आहेत तर कुणाचे मोबाईल नंबर चुकीचे टाकण्यात आले आहेत. विशेष म्हणजे ज्यांच्या घरांचे नुकसान झाले त्यांचाच खाते क्रमांक आवश्यक होता. यादीतील चुकामुळे शहरातील नागरिकांना मदत मिळाली नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

नायगाव शहरातील नागरिकांना मदत देण्याची संपूर्ण तयारी झालेली आहे. मात्र नगरपंचायतने दाखल केलेल्या यादीमध्ये अनेक त्रुटी होत्या त्या दुरुस्ती करण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांना सुचना दिलेल्या आहेत. त्रुटींची पुर्तता झालेल्या याद्या येताच मदत थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल.
सौ.धम्मप्रीया गायकवाड, तहसीलदार नायगाव.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker