ताज्या बातम्यानांदेडनायगांव

किनाळा सार्वजनीक दुर्गा मंडळाच्या वतीने MBBS साठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान

मोरे मनोहर

किनाळा :- किनाळा तालुका बिलोली येथील जय जिजाऊ सार्वजनिक दुर्गा मंडळाच्या वतीने गावातील 6 जणांपैकी 5 मुली तर एकाच परिवारातील दोन सख्ख्या बहिणीची एकाच वेळी MBBS साठी यंदा निवड झाल्याने त्यांचा व त्यांच्या पालकांचा दुर्गा महोत्सव समितीच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला असल्याने त्यांच्या या स्तुत्य उपक्रमांचे सर्वत्र कौतुक केल्या जात आहे.

बिलोली तालुक्यातील किनाळा येथील जय जिजाऊ सार्वजनिक दुर्गा मोहत्सवा निमीत्त गावातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला यात किनाळा गावातून तब्बल 6 विद्यार्थ्यांची NEET परीक्षेद्वारे एमबीबीएस साठी निवड झाली असून निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा जय जिजाऊ सार्वजनीक दुर्गा मंडळाच्या वतीने सन्मान करण्यात आले.

ग्रामीण भागांतील कु.अनुष्का बाबुराव माने, श्रुती माधवराव किनाळकर, अंजली व्यंकटराव पाटील, संकेत देविदास भोसले यांची तर एकाच कुटुंबातील दोन सख्ख्या बहिणी असलेल्या साक्षी हनमंतराव भोसले आणि प्रिया हनमंतराव भोसले यांची अशा एकुण 6 विद्यार्थ्यांची NEET परीक्षेद्वारे एमबीबीएस साठी निवड झाली असून निवड झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा जय जिजाऊ दुर्गा महोत्सव समितीच्या वतीने सन्मान करण्यात आला.

ग्रामीण भागात असलेल्या लहानशा खेडेगावातील एकाच वर्षी तब्बल सहा विद्यार्थी एमबीबीएस निवड झाल्याने या निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे गावकऱ्यांच्या वतीने स्वागत करण्यात आले असून त्यांच्या पुढील कार्यास अनेकांनी शुभेच्छा दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker