ताज्या बातम्यानांदेडबिलोली

डॉ.बाबासाहेबांची तुलना मद्यपीसी केल्या प्रकरणी रामतीर्थ पोलिसात गुन्हा दाखल

मोरे मनोहर

किनाळा :- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सारखी प्रतिकात्मक वेशभूषा घातलेल्या मदधुंद अवस्थेत असलेल्या आणि नालीत पडलेल्या मद्यपीसी तुलना करणारा प्रत्तीकात्मक बाबासाहेबांचा व्हिडिओ मोबाईलच्या इंस्टाग्राम वर ठेवून आंबेडकरवादी समाज बांधवांच्या भावना दुखावल्या प्रकरणी हिप्परगा माळ येथील एका विरुद्ध रामतीर्थ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की हिप्परगा माळ तालुका बिलोली येथील शेख माजीत पाशामीया शेख यांनी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सारखी प्रतीकात्मक वेशभूषा असलेल्या मधधुंद अवस्थेतील आणि नालीत पडलेल्या अवस्थेतील मद्यपीसी बाबासाहेबांची तुलना करणारा व्हिडिओ त्यांच्या मोबाईल क्रमांक 9309568943 च्या इंस्टाग्रामवर ठेवून बाबासाहेबांची व तमाम आंबेडकरवादी अनुयायांची जाणीवपूर्वक भावना दुखवण्याच्या उद्देशाने असा व्हिडिओ इंस्टाग्राम वर ठेवली असल्याचे हिप्परगा माळ येथील आंबेडकरवादी सामाजिक कार्यकर्त्यांच्या मोबाईलवरील इंस्टाग्राम वर दिसून आल्या.

हिप्परगा माळ येथील आंबेडकरवादी सामाजिक कार्यकर्ते विक्रम सिद्धार्थ सोंडारे यांच्या मोबाईल इंस्टाग्राम पहात असताना त्यांच्या या इंस्टाग्राम वर गावातील शेख माजिद पाशामिया शेख यांनी इंस्टाग्राम वर बाबासाहेबांची जाणीवपूर्वक एका मद्यपीसी तुलना करणारा व्हिडिओ ठेवून बाबासाहेबांचा व तमाम आंबेडकरवादी अनुयायांच्या भावना दुखावल्या याप्रकरणी हिप्परगा माळ येथील विक्रम सिद्धार्थ सोंडारे यांनी दिलेल्या लेखी फिर्यादीवरून रामतीर्थ पोलीस ठाण्यात दिनांक 5 ऑक्टोबर रोजी हिप्परगा माळ तालुका बिलोली येथील शेख माजिद पाषामीया शेख यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस स्टेशनचे सपोनी विक्रम हराळे यांच्या मार्गदर्शनाखाली केला जात आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जाणीवपूर्वक एका मद्यपीसी तुलना करणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्याविरुद्ध योग्य ती कारवाई करण्यात यावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे तालुका कोषाध्यक्ष गंगाधर कांबळे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker