कुंडलवाडी नगराध्यक्ष पद खुल्या वर्गासाठी होणार सामना
◆ खुला सर्वसाधारण साठी नगराध्यक्ष पद राखीव ◆ भाजपकडून नगराध्यक्ष पदाचे प्रबळ दावेदार म्हणून सुनील बेजगमवार यांचे नाव चर्चेत

कुंडलवाडी :- कुंडलवाडी सह राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायत तिचे नगराध्यक्ष पदाचे आरक्षण आज दि. 6 ऑक्टोबर रोजी मुंबई येथील मंत्रालयात काढण्यात आले. कुंडलवाडी नगराध्यक्ष पद हे ओपन (खुला) सर्वसाधारण साठी सुटल्याने कुंडलवाडी नगराध्यक्षपदाच्या खुर्चीसाठी ओपन सामना होणार असून भारतीय जनता पक्षाकडून नुकतेच भाजप उद्योग आघाडीचे जिल्हा संयोजक व आत्मनिर्भर भारत कार्यक्रमाचे देगलूर विधानसभेचे प्रवक्ते कुंडलवाडी चे माजी नगराध्यक्ष तथा सोसायटीचे विद्यमान चेअरमन सुनील बेजगमवार हेच भारतीय जनता पक्षाकडून नगराध्यक्ष पदाचे प्रबळ दावेदार असल्याची चर्चा सध्या शहरात होत आहे.
चार वर्षापासून रखडलेल्या कुंडलवाडी नगर परिषदेचा निवडणुक कार्यक्रम लवकरच जाहीर होणार असून दिवाळीनंतर कुंडलवाडी नगरपरिषद निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. आज दि.6 ऑक्टोबर रोजी मुंबई येथील मंत्रालयात राज्यातील नगरपालिका व नगरपंचायतीच्या आरक्षण सोडत काढण्यात आली. यात कुंडलवाडी नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद ओपन( खुला ) सर्वसाधारण साठी आरक्षित करण्यात आले आहे. त्यामुळे आगामी काळातील निवडणुकीत नगराध्यक्षपदाच्या खुर्चीचा ओपन सामना रंगतदार होणार आहे.
यातच भारतीय जनता पक्षाकडून सध्या सोसायटीचे चेअरमन व माजी नगराध्यक्ष सुनील बेजगमवार यांना गत आठवडाभरात भारतीय जनता पक्षाकडून भाजप उद्योग आघाडीचे जिल्हा संयोजक पद व आत्मनिर्भर भारत या अभियानाचे देगलूर विधानसभेचे प्रवक्ता म्हणून भारतीय जनता पक्षाकडून जबाबदारी देण्यात आली. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने सुनील बेजगमवार यांच्यावर दोन्ही पदे देऊन मोठा विश्वास दाखवला आहे.
त्यामुळे आगामी काळातील नगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून सुनील बेजगमवार हे नगराध्यक्ष पदाचे प्रबळ दावेदार असण्याची दाट शक्यता असून याबाबत शहरातील नागरिकांमध्ये सुनील बेजगमवार हे भारतीय जनता पक्षाकडून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असतील याबाबत चर्चा होत आहे.



