कुंडलवाडी नगरपरिषदेच्या सदस्यांची आरक्षण सोडत जाहीर
◆ दहा जागा महिलांसाठी आरक्षित ◆अनेक दिग्गजांचे स्वप्न भंगले

कुंडलवाडी :- येथील नगर परिषदेच्या आगामी होऊ घातलेल्या निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये दहा प्रभागाच्या २० जागेसाठी सुधारित आरक्षण सोडत नगर परिषदेच्या सभागृहात दि.८ आँक्टोबर रोजी दुपारी २ वाजता बिलोलीच्या उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आले आहे.

कुंडलवाडी नगरपरिषदेत एकूण २० जागेसाठी १० प्रभागाची रचना करण्यात आली असून, त्यानुसार अनु जाती २, अनु जमाती ५, नागरिकांचा मागास प्रवर्ग ५ सर्वसाधारण ८ असे २० जागा निश्चित करण्यात आले त्यापैकी अनु जाती १,अनु जमाती ३, नागरिकांचा मागास प्रवर्ग ३, सर्वसाधारण महिला ३ असे एकूण १० जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे.
तर प्रभाग निहाय आरक्षण सोडत पुढील प्रमाणे प्रभाग क्रमांक ०१(नरागल्ली परिसर)- अ) अनु जमाती महिला ब) नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक ०२(डॉ.साठे नगर,डॉ. आंबेडकर नगर) – अ)अनु जाती महिला ब )सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक ०३(नवे पोलीस स्टेशन परिसर)- अ)अनु जाती सर्वसाधारण ब)सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक ०४ (बसस्थानक परिसर) – अ)अनु जमाती सर्वसाधारण ब) नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक ०५(कोटलावार गल्ली)- अ)अनु जमाती महिला ब)सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक ०६ (शतरंजगल्ली)- अ ) नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ब )सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक ०७ (जोड मारोती मंदिर परिसर) – अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ब) सर्वसाधारण.
प्रभाग क्रमांक ०८ (नाईकवाड गल्ली) – अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ब)सर्वसाधारण प्रभाग क्रमांक ०९ (हुंडेकर गल्ली,जुने पोलीस स्टेशन परिसर) – अ)अनु जमाती महिला ब)सर्वसाधारण प्रभाग क्रमांक १० (फुलारी बेस नाका परिसर,पोस्ट ऑफिस परिसर ) – अ)अनु जमाती महिला ब)सर्वसाधारण महिला अशा पद्धतीने प्रभाग निहाय आरक्षण मुलांच्या हस्ते चिठ्ठी काढून सोडत जाहीर करण्यात आले आहे.
यावेळी निवडणूक नियंत्रण अधिकारी म्हणून बिलोलीच्या उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांनी काम पाहिले तर त्यांना सहकार्य, नायब तहसीलदार रघुनाथसिंह चौहान, नायब तहसीलदार बालाजी मिठ्ठेवाड, मुख्याधिकारी दीपक मोरे, सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे यांनी केले. यावेळी शहरातील सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी, पत्रकार, पोलीस कर्मचारी, नगरपालिका कर्मचारी, व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.



