ताज्या बातम्यानांदेडबिलोली
कुंडलवाडी येथील आर्य वैश्य समाजाची कार्यकारिणी जाहीर
◆अध्यक्षपदी अनिल मुनगीलवार, उपाध्यक्षपदी साईनाथ दाचावार तर सचिवपदी दिनेश कत्रुवार यांची निवड

कुंडलवाडी :- येथील आर्य वैश्य समाज बांधवांची बैठक ७ आँक्टोबर रोजी श्री बालाजी मंदिर येथे पार पडली.यात समाजाची नुतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. अध्यक्षपदी अनिल मुनगीलवार, उपाध्यक्षपदी साईनाथ दाचावार, तर सचिवपदी दिनेश कत्रुवार यांची सर्वानुमते या बैठकीत निवड करण्यात आली आहे.
उर्वरित कार्यकारिणी पुढीलप्रमाणे सहसचिव- यशोदीप मुनगीलवार, कोषाध्यक्ष -विशाल उपलंचवार, सदस्यपदी मनोज कोंडावार, गोविंदराज उत्तरवार, सौरभ गुंडाळे, आदित्य बेजगमवार, रौनित मुनगीलवार, गौरव दाचावार यांची निवड करण्यात आली आहे. या बैठकीस शहरातील आर्य वैश्य समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. आर्य वैश्य समाजाच्या नुतन कार्यकारिणी चे सर्वत्र अभिनंदन होत आहे.



