ताज्या बातम्यादेगलुरनांदेड

पश्चिम बंगालमधील मजुराचा खड्ड्यात पडून मृत्यू : देगलूरच्या नवीन बसस्थानकातील घटना

New Bharat Times नेटवर्क

देगलूर : पश्चिम बंगालमधून रोजगारासाठी देगलूर येथे आलेल्या एका मजूराचा खड्यातील पाण्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री उशिरा घडली. गुत्तेदाराच्या गलथान कारभारामुळे देगलूर बसस्थानकावर उतरल्या उतरल्या दुसऱ्या राज्यातील मजूराला आपला जीव गमवावा लागल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

पश्चिम बंगालमधील हिमताबाद जि. उत्तरजनकपूर येथील युवक हनिसुरामन वय ३५ हा कामाच्या शोधात पश्चिम बंगाल येथून देगलूर येथे गुरुवारी रात्री उशिरा नवीन बस स्थानकात उतरला. त्याला लघुशंका आल्याने त्याने नवीन बस स्थानकातील सुलभ शौचालयाच्या बाजूस गेला, तेथे बांधकामाच्या वेळी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात भर न घातल्याने त्यात मोठ्या प्रमाणात घाण पाणी व पावसाचे पाणी साचले होते. परिसरात अंधार असल्याने त्या युवकास खड्ड्याचा अंदाज आला नाही. पाय निसटुन तो खड्ड्यात पडला. खड्ड्यात पडताच त्याने आरडाओरड केली मात्र त्याच्याकडे कोणाचेही लक्ष गेले नाही. पाणी मोठ्या प्रमाणात असल्याने पोटात पाणी गेले त्यातच गुदमरून त्याचा जागीच मृत्यू झाला.

त्यानंतर त्याचे प्रेत उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. नातेवाईकांना कळल्यानंतर त्यांनी शवाविच्छेदन करू नये असा आग्रह धरला होता, मात्र रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी पुढील कार्यवाही सुरू असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संभाजी पाटील यांनी सांगितले. नवीन बसस्थानकातील खड्ड्यात भराव न टाकल्यामुळे परराज्यातील एका युवकाला नाहक प्राणास मुकावे लागले. याप्रकरणी संबंधित कंत्राटदाराची चौकशी करावी अशी मागणी या निमित्ताने केली जात आहे. या प्रकरणी देगलूर पोलिसात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker