ताज्या बातम्यानांदेडबिलोली

कुंडलवाडी पोलीस स्टेशन आयोजित एकता दौड संपन्न

◆ महिला व पुरुषांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ◆पुरुष व महिला गटातील विजेत्यांचा सन्मानपत्र देऊन गौरव

कुंडलवाडी :- सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त नांदेड जिल्हा पोलिस यांच्या तर्फे कुंडलवाडी पोलिस स्टेशन मार्फत “Run For Unity – 2025” एकता दौड या मॅरेथॉन स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले. या स्पर्धेला पुरुष व महिला वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

स्पर्धेचे उद्घाटन पुरुष गटासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र कुंडलवाडी वैद्यकीय अधिकारी डॉ.हाजेरा फातेमा व नायब तहसीलदार रघुनाथसिंह चव्हाण यांच्या हस्ते झाले. तर महिला गटाचे उद्घाटन राजेश्वरराव उत्तरवार व दिनेश दाचावार यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

पुरुष गटातील विजेते –
प्रथम -प्रकाश हनुमल्लू शेट्टीवार, अर्जापूर
द्वितीय -.श्रीकांत पोतना मंदावार, कुंडलवाडी
तृतीय -सुजय लक्ष्मण कोनेरवार, कुंडलवाडी

महिला गटातील विजेते –
प्रथम – लता साईनाथ ठक्कुरवाड, कुंडलवाडी
द्वितीय -राजश्री मोगलाजी वाघमारे, कुंडलवाडी
तृतीय ज्योती गंगाधर गवळे, माचनूर

कार्यक्रमास प्रमुख अतिथीसामाजिक कार्यकर्ते साईनाथ उत्तरवार, सुरेश दुगमोड, डॉ.प्रशांत सब्बनवार, पत्रकार संघटनेचे अध्यक्ष कुणाल पवारे, प्रा.डॉ.माधव हळदेकर, संतोष चव्हाण, पत्रकार नागनाथ कोलंबरे, संतोष शिवशेट्टे, श्रीकांत बोलचटवार तसेच महिला दक्षता समितीच्या अध्यक्षा संगीताताई मेरगेवार आदी मान्यवर उपस्थित होते.

विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्रे आणि पारितोषिके प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक तसेच आयोजन पोलीस सहाय्यक निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.नरेश बोधनकर यांनी केले, तर आभाप्रदर्शन पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र मांजरमकर यांनी केले. या मॅरेथॉनमधून समाजात एकतेचा, देशभक्तीचा व आरोग्य जागृतीचा संदेश देण्यात आला. स्पर्धेचा समारोप “एकत्र येऊया, एकतेसाठी धावूया!या घोषवाक्याने झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker