ताज्या बातम्यानांदेडमहाराष्ट्र

उपायुक्त वैभव वाघमारे यांच्या उपस्थितीत आज नांदेड आंबेडकर मिशनमध्ये उद्योजक परिषद

मोरे मनोहर

किनाळा :- नांदेड येथे होतकरू तरुण युवा विद्यार्थ्यांचे विविध क्षेत्रात करिअर घडवण्यासाठी चालवण्यात येत असलेल्या आंबेडकर मिशनमध्ये आज दिनांक 31 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा वाजता उद्योग खात्याचे उपविकास आयुक्त आणि सनदी अधिकारी वैभव वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्योजक प्रशिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले असून या परिषदेस मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान आंबेडकर मिशनचे प्रमुख दीपक कदम यांनी केले आहे.

सरकारी नोकरीचे कमी झालेले प्रमाण यामुळे अनेक सुशिक्षित युवा तरुणांसमोर उद्योग उभारण्याशिवाय पर्याय नाही हे लक्षात घेऊन पीएम योजना, सीएम योजनेचा लाभ घेऊन तरुणांनी पुढे आले पाहिजे हा दूरदृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून आंबेडकर मिशनमध्ये उद्योजक प्रशिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले असून या परिषदेत मार्गदर्शन करण्यासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उद्योग खात्याचे उपविकास आयुक्त आणि सनदी अधिकारी वैभव वाघमारे हे उपस्थित राहणार असुन यावेळी जिल्हा उद्योग केंद्र आणि एमआयडीसी मधील काही वरिष्ठ अधिकारी देखील या कार्यक्रमात उपस्थित राहून तरुणांना उद्योगासंबंधी माहिती देणार असल्याचे दिपक कदम यांनी सांगितले.

याप्रसंगी यशस्वीउद्योजक म्हणून आर के सिंग बुलंदशहर मार्शल उद्योग, सी.आर.सांगलीकर, बालाजी कंठेवाड, मारुती कंठेवाड, प्रकाश नगारे, अशोक जोंधळे, माधव डोम्पले, मधुकर गच्चे, सूर्यकांत गादेवार सावकार, स्वप्निल नरबाग, प्रदीप वाघमारे, भगवान धबडगे, गौतम कांबळे, देविदास रंगदल, प्रसनजीत वाघमारे, प्रशिक चित्ते, शिवराज टोम्पे आधीसह यशस्वी उद्योजकांचाआंबेडकर मिशनच्या वतीने सन्मान करण्यात येणार आहे.

आजच्या तरुणांनी बेरोजगारीला न घाबरता उद्योग व्यवसायात आपले यशस्वी करिअर घडवण्यासाठी पुढे आले पाहिजे यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या उद्योजक प्रशिक्षण परिषदेस मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान आंबेडकर मिशनचे प्रमुख दीपक कदम यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker