कुष्णूर येथे बिबट्याचा वन विभागाच्या कर्मचाऱ्यासह एकावर हल्ला : जेरबंद करण्यासाठी ट्रँप कँमेरे व पिंजरे

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : कुष्णूर औद्योगिक वसाहतीत असलेल्या एका कंपणीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना शनिवारी 3.30 वाजता घडली. दरम्यान बिबट्या कुठे आहे हे पाहण्यासाठी कंपणीत गेलेल्या वन विभागाच्या कर्मचाऱ्यावरही हल्ला केल्याची घटना घडली. दोन्ही जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कंपणीत दबा धरून बसलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी ट्रॅप कॅमेरे व पिंजरा लावण्यात आला असून वन विभागाचे अधिकारी कुष्णूर येथे तळ ठोकून बसले आहेत.

जिल्ह्यात बिबट्या दिसल्याच्या व पशुवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या पण नायगाव तालुक्यातील कुष्णूर औद्योगिक वसाहतीतील मेधावी पाईप कंपणीतील कर्मचारी श्रीकांत पोपुलवाड हा शनिवारी ३.३० वाजताच्या दरम्यान लघूशंका करण्यासाठी बाजूला आला असता अचानक बिबट्याने पाठीमागून हल्ला केला. त्यामुळे त्यांनी घाबरून पळ काढला पण बिबट्या कंपणीतच लपून बसल्याची माहिती वनविभागाला देण्यात आली.

घटनेचे गांभीर्य ओळखून वन विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक श्री भारत खेलवाडे साहेब व देगलूर चे वन परिक्षेत्र अधिकारी श्री देवकते साहेब यांचे, सह वनपाल संतवाले, डावखरे साहेब वनरक्षक गजानन कोतलवार, वनरक्षक सहदेव दोसलवार, वनरक्षक शिवाजी केंद्रे, वनमजूर अविनाश कलकटवार कोरडे, कदम, अंबुलगे, पत्रकार संजय निळेकर यांचे सोबत सर्व वनाधिकारी सदर ठिकाणी माहिती मिळतात लगेच मिनिटात दहा ते पंधरा मिनिटांमध्ये घटनास्थळी हजर झाले.
बिबट्या कंपणीतच असल्याची खात्री झाल्यावर जेरबंद करण्यासाठी ट्रॅप कॅमेरे व पिंजरा लावण्यात आला. दरम्यान सर्व लोकांनी आजूबाजूला येऊ नये , एकट्याने फिरू नये, रात्री शेती व बाहेर जात असताना एकट्याने जाऊ नये असे आवाहन करण्यात आले. कंपणीत लपलेल्या बिबट्याचा शोध घेत असताना वन विभागाचे कर्मचारी असलेले गुलाब जाधव यांच्यावरही बिबट्याने हल्ला केला. कंपणीत जखमी झालेले श्रीकांत पपूलवाड व गुलाब जाधव यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
सदरचा बिबट्या हा नर जातीचा असून सहा वर्षाचा असल्याचा अंदाज वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.



