ताज्या बातम्यानांदेडमहाराष्ट्र

दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ २३ जुलैच्या महाराष्ट्र बंदमध्ये सर्वांनी सहभागी व्हा : वंचित बहुजन आघाडी, नांदेड

New Bharat Times नेटवर्क

नांदेड : दिल्ली येथे शांततापूर्ण व लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या लाठीचार्ज व बळाच्या वापराचा वंचित बहुजन आघाडी, नांदेड जिल्ह्याच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाने दिलेल्या शांततापूर्ण आंदोलनाच्या अधिकारावर अशा प्रकारे गदा आणणे हे लोकशाही मूल्यांना धक्का देणारे असून, अशा दडपशाहीविरोधात संपूर्ण महाराष्ट्राने एकजूट दाखविण्याची गरज असल्याचे मत संघटनेने व्यक्त केले आहे.

या घटनेच्या निषेधार्थ मा. ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी दि. २३ जुलै २०२६ रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली असून, या बंदला वंचित बहुजन आघाडी, नांदेड (उत्तर व दक्षिण) यांनी संपूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे.

या पार्श्वभूमीवर दि. २२ जुलै २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता शासकीय विश्रामगृह, नांदेड येथे तातडीची समन्वय बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, शैक्षणिक संस्था, व्यापारी संघटना, एस.टी. कर्मचारी, ऑटो रिक्षा युनियन, कामगार संघटना तसेच विविध क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

तसेच दि. २३ जुलै २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता महात्मा फुले पुतळा, आयटीआय कॉर्नर, नांदेड येथे सर्वांनी एकत्र जमून महाराष्ट्र बंद यशस्वी करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

याशिवाय, नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक संघटना व नागरिकांनी आपल्या-आपल्या तालुक्यात शांततापूर्ण व संविधानिक मार्गाने महाराष्ट्र बंद यशस्वी करण्यासाठी सक्रिय सहभाग घ्यावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

लोकशाही, संविधान आणि विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांच्या संरक्षणासाठी विद्यार्थी, पालक, शिक्षक, व्यापारी, कामगार, शेतकरी, एस.टी. कर्मचारी, ऑटो रिक्षा चालक, सामाजिक व राजकीय संघटनांचे पदाधिकारी आणि सर्व न्यायप्रिय नागरिकांनी मोठ्या संख्येने महाराष्ट्र बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन शंकर गंगाधर महाजन, जिल्हाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी, नांदेड (दक्षिण) आणि प्रा. राज अटकोरे, जिल्हाध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी, नांदेड (उत्तर) यांनी संयुक्तपणे केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker