कुंडलवाडीचा मटका किंग सय्यद तौफिक ऊर्फ गोऱ्या सय्यद अंजुम ५ महीन्यासाठी नांदेड व लातुर जिल्हयातुन हद्दपार…
◆ उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांनी काढले आदेश ◆ कुंडलवाडी पोलिसांचा सतत पाठपुरावा ◆ अजून ६ जण हद्दपार होणार… लवकरच निघणार आदेश

कुंडलवाडी :- कुंडलवाडी शहरातील मटका व जुगार खेळणारा व सार्वजनिक शांतता भंग करुन दहशत निर्माण करणारा सय्यद तौफिक ऊर्फ गोऱ्या सय्यद अंजुम (वय २५ वर्ष ) रा. कुंडलवाडी ता. बिलोली यास ०५ महीन्यासाठी नांदेड व लातुर जिल्हयातुन हददपार केले आहे. कुंडलवाडी पोलिसांनी बिलोलीच्या उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांच्याकडे प्रस्ताव पाठवून सतत पाठपुरावा केल्याने सदरील हद्दपारीचे आदेश उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांनी काढले आहेत.
सय्यद तौफिक ऊर्फ गोऱ्या सय्यद अंजुम यास हद्दपार आदेशाची बजावणी करण्यात आली असुन त्यास ०५ महीन्याच्या कालावधीसाठी नांदेड व लातुर जिल्हयातुन हददपार करण्यात आलेले आहे. उपविभागीय दंडाधिकारी, बिलोली यांच्या परवानगी शिवाय प्रवेश करु शकणार नाही.
सदर हद्दपारीसाठी कुंडलवाडी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे व प्रतिबंधक कार्यवाही चा स्टाफ यांनी सतत पाठपुरावा केला होता. तत्कालिन उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत संपते साहेब, उपविभाग धर्माबाद यांच्या मार्फतीने सदरचा प्रस्ताव उपविभागीय अधिकारी कार्यालय, बिलोली येथे दाखल करण्यात आला होता.
आगामी काळातील निवडणुका शांततेने पार पाडाव्यात याकरीता अजून ६ जणांचे हद्दपार प्रस्ताव उपविभागीय अधिकारी, उपविभाग बिलोली यांच्या कार्यालयात प्रलंबित असुन त्याबाबत पाठपुरावा सुरु आहे. तेही आदेश लवकरच निघतील अशी माहिती कुंडलवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे यांनी दिली आहे.



