विध्यार्थी बनले एका दिवसाचे शिक्षक ; य.म. व जु.काॅ.मध्ये स्वयंशासन दिन साजरा

अंकुशकुमार देगांवकर
नायगाव:- विध्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास व्हावा यां उद्देशाने प्रत्येक शाळेत विध्यार्थ्यांना ज्ञान दानाच काम केलं जात. विध्यार्थ्यांचा शैक्षणिक, बौद्धिक, मानसिक विकास साधण्यासाठी विविध उपक्रम हाती घेतले जातात. विध्यार्थ्यांचे भाषण- संभाषण कौशल्य वाढविण्यासाठी शाळेत स्वयंशासन दिन साजरा केला जातो. त्यामाध्यमातून विध्यार्थ्यांना स्टेज करेज वाढण्यास मदत होते. याअनुषंगाने दिनांक 20 जानेवारी 2026 रोजी यमुनाबाई माध्यमिक व जुनिअर कॉलेज मध्ये स्वयंशासन दिन साजरा करण्यात आला.

यावेळी प्रशासकीय प्रमुख प्राचार्य फाजगे के.व्ही. सर, पर्यवेक्षक प्रा.नकाते एस.एम, प्रा. घोगरे सर, प्रा.मोरे डी. एम.व स्वयंशासन विभाग प्रमुख प्रा.सौ.घाटे ए.एस. यांच्या उपस्थिती मध्ये स्वयंशासन दिन पार पडला. यावेळी प्रशासकीय शिक्षकांनी विध्यार्थ्यांना पदग्रहण करून पुष्प गुच्छ देऊन सन्मानित केले.
प्राचार्य फाजगे के.व्ही. सर यांच्या मार्गदर्शनाने स्वयंशासनं दिन घडवण्यात आला. यावेळी विध्यार्थ्यांमधून घडलेल्या प्राचार्या कु.वेदिका पांढरे, उपप्राचार्या कु.वाघमारे प्रतीक्षा, पर्यवेक्षिका कु.टोकलवाड महादेवी, ग्रंथपाल कु.कांबळे अंकिता व लिपिक कु.शिंदे शुभांगी यांनी एका दिवसासाठी आपले पदग्रहण करून स्वयंशासन दिन पार पाडण्याची भूमिका निभावली.
स्वयंशासन दिनास शिक्षक म्हणून कु.मोरे दिपाली, कु. ठाकूर अपूर्वा, कु.दासरवाड सुजाता, कु.शिंदे शुभांगी, कु.मोरे आरती, कु.हणमंते प्रज्ञा, कु.वाघमारे कोमल कु.आमलापुरे शिवराणी, कु.शेळके श्रध्दा, कु.हिवराळे परमेश्वरी, कु.पांचाळ अनुजा, कु.डोईफोडे मैनावती, कु.सुगावे वेदिका, कु.टोकलवाड महादेवी, कु.पांचाळ अनुजा, कु.कदम वैष्णवी, कु.मंगरुळे ऋतुजा, कु.जाधव वैष्णवी, कु. सुगावे वेदिका, कु.नायगावकर रक्षिता, कु.मोरे गायत्री, कु.डोईफोडे साक्षी, कु.पांढरे संजना, कु.वाघमारे पूनम इत्यादी विध्यार्थिनी सहभाग घेतला होता.
सहभागी प्राध्यापिकांचे अंतर्गत मूल्यांकन करण्याचे काम प्रा.सौ.हटवार के.डब्लू व प्रा.सौ.पिंपळदरे आर. डी. यांनी केले. दुपार सत्रात बोल अनुभवाचे या कार्यक्रमात 12वी व 11वी तील विध्यार्थिनी व आजच्या प्रशासनातील सहभागी प्राध्यापिकेनी स्वानुभवातून आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमास मार्गदर्शन प्रा.घोगरे डी.व्ही. व जुनिअर विभागाचे पर्यवेक्षक प्रा.नकाते एस.एम सरांनी मार्गदर्शन केले व स्वयंशासन दिनाच्या उत्तम नियोजनाबद्दल विभाग प्रमुख प्रा.सौ.घाटे ए.एस.यांचे व सहभागी विध्यार्थिनीचे कौतुक केले. या कार्यक्रमचे सूत्र संचालन कु.दिपाली मोरे व कु.वर्षा ठाकूर हिने केले तर आभार कु.श्रद्धा शेळके हिने मांडले.



