ताज्या बातम्यानांदेडनायगांव

संजय गांधी, श्रावण बाळ योजनेतील ४०२ अर्ज मंजूर ; आ.राजेश पवार यांच्या उपस्थितीत नायगाव येथे बैठक संपन्न

लक्षण बरगे

नायगाव : येथील तहसील कायार्लात दि.२२ जानेवारी रोजी सजंय गांधी, श्रावण बाळ योजनेची बैठक योजनेचे अध्यक्ष कार्यसम्राट आ.राजेश पवार व सचिव तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड, यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. यात श्रावण बाळ योजना व संजय गांधी योजनेमधून ४०२अर्ज मंजूर करण्यात आल्याने तळागाळातील लाभार्थ्यांना न्याय देण्याचे काम या समितीने केल्याचे दिसून येत असून योजनेचा लाभ घेणाऱ्यांनी दलालाच्या मागे न लागता स्वतः अर्ज तहसीलमध्ये दाखल करून कोणालाही एक रुपया देऊ नका असे आव्हाण आ. राजेश पवार यांनी या बैठकीत केले.

राज्य सरकार व केंद्र सरकारकडून विधवा व अपंग लाभार्थ्यांना संजय गांधी तर वयोवृद्ध लाभार्थ्यांना श्रावण बाळ योजनतेतुन दर महा १ हजार ५०० ते २५०० रुपये अनुदान दिले जाते. यासाठी प्रस्ताव तहसील मध्ये दाखल करावा लागतो. पुर्वी तर तीन महीण्याला बैठक होत होती पण नवीन जीआर नुसार दर महीण्याला बैठक होत आहे.

आ.राजेश पवार हे नुकतेच या समितीचे अध्यक्ष झाले असुन गुरुवारी नायगाव तहसिल मध्ये बेठक घेण्यात आली. संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजनेतील ४७१ अर्ज प्राप्त झाले होते त्यातून ६९ अर्ज तुरटीमध्ये निघाले तर प्राप्त अर्जा पैकी श्रावण बाळ योजनेचे २५९ तर संजय गांधी योजनेचे १४३ असे ४०२ अर्ज या बैठकीत मंजूर करण्यात आल्याने अनेक गोरगरीब पाटील कुटुंबातील लाभार्थ्यांना शासनाकडून अनुदान मिळणार आहे. एका बैठकीत ४०२ प्रस्ताव मंजूर झाल्याने लाभाथ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. एवढ्‌या संख्येनी एका बैठकीत प्रस्ताव मंजुर झाल्याची नोंद ब-यांच वषानंतर झाल्याने त्यावरून दिसून येते.

या बैठकीला समितीचे सदस्य व्यंकटराव सुरेवाड, गंगाधर पा.नारे, सौ.पल्लवी पा.वडजे, हे उपस्थितीत होते. तालुक्यातून आलेल्या प्रस्तावाची तपासणी होऊन आलेल्या प्रस्ताव पैकी ४०२ मंजूर झालेल्या नव्या लाभाथ्यांना अनुदानाचा लाभ मिळणार आहे. या कामासाठी नायब तहसीलदार विजय येरावार, लिपिक शरद बोरामने, संगणक ऑपरेटर गुरुनाथ कदम आदीनी काम पाहिले. यावेळी भाजपचे विधानसभा अध्यक्ष बाबासाहेब पा.हंबर्डे, सोमठाणा येथील सरपंच प्रतिनिधी परमेश्वर पा.जाधव, बालाजी घोसलवाड, राहुल गायकवाड, सरपंच गजानन पा.तोडे आदीजण उपस्थित होते.

लाभार्थ्यांनी कोणालाही पैसे देऊ नये आ.राजेश पवार…
या योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांनी स्वतः अर्ज तयार करून नायगाव तहसील मध्ये दाखल करावा कुणाकडेही अर्ज देऊ नये तसेच या कामासाठी कोणालाही पैसे देऊ नका असे आवाहन आमदार राजेश पवार यांनी नायगाव तालुक्यातील लाभार्थ्यांना केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker