ताज्या बातम्यानांदेडबिलोली

मनूर येथे जुगार खेळणा-या ४ जणांना अटक

◆ऐन गुलाबी थंडीत कुंडलवाडी पोलीसांची रात्री कारवाई ◆ आरोपीमध्ये मनुर येथील तंटामुक्ती अध्यक्ष यांचा समावेश

कुंडलवाडी :- कुंडलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मनुर येथे मारुती मंदिराच्या पाठीमागे जुगार खेळताना ४ जणांना कुंडलवाडी पोलिसांनी अपक केली आहे. आरोपीकडून जुगाराच्या साहित्यासह १४ हजार ५३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून ४ आरोपीविरूद्ध कुंडलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई दि.८ नोव्हेंबर रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास केली आहे.

कुंडलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या मनुर येथील मारुती मंदिराच्या पाठीमागील ओट्यावर जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यावर कुंडलवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर शिंदे, पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र मांजरमकर, पोलीस कर्मचारी रघुवीरसिंह चौहान, आनंद बोडके, अजय बोलमवार, माधव वडेटवार यांच्या पथकाने दि.८ नोव्हेंबर रोजी रात्री अकरा वाजता धाड मारून जुगार खेळणा-या ४ जणांना अटक करून आरोपीकडून जुगाराच्या साहित्यासह १४ हजार ५३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपी एकनाथ बाबुराव जिंकले (३८), श्रीनिवास बाबू बोलचेटवार (३९), राम संभाजी कवडेकर (३४), बाबू सायबू निरगुटले (४३) सर्व राहणार मनुर ता.धर्माबाद यांच्या विरूद्ध पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र मांजरमकर यांच्या फिर्यादीवरून गुरनं १७३/२०२५ कलम १२(अ) महाराष्ट्र जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून चारही आरोपींना कुंडलवाडी पोलिसांनी अटक केली आहे.

ऐन गुलाबी थंडीत दि.८ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री मनुर येथे जुगार खेळणाऱ्या चार जणांना कुंडलवाडी पोलीसांनी अटक केल्यानै कुंडलवाडी पोलीसांचे पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, पोलीस उपअधीक्षक दशरथ पाटील आदींनी कौतुक केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker