ताज्या बातम्यानांदेडबिलोली

थडी सावळी येथे प्रेम प्रकरणातून २२ वर्षीय तरुणाचा खून रामतीर्थ पोलिसात गुन्हादाखल

मोरे मनोहर

किनाळा :- बिलोली तालुक्यातील थडी सावळी येथे प्रेम प्रकरणातून २२ वर्षीय तरुणाचा खून झाल्याची धक्कादायक घटना 3 मार्च रोजी उघडकीस आली असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली या घटनेची माहिती मिळताच बिलोली येथील उपविभागीय पोलीस अधिकारी श्याम पानेगावकर आणि रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सपोनी विक्रम हराळे यांनी घटनास्थळी धाव घेत या प्रकरणणातील सात आरोपींना अटक करून त्यांच्याविरुद्ध रामतीर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

अधिक माहिती अशी की मुतन्याळ तालुका बिलोली येथील दुर्गेश्वर धारासिंग ठाकूर वय वर्षे 22 या तरुण युवकांना त्यांच्या घरून त्यांना थोडी सावळी येथे बोलावून नेउन तू अनैतिक संबंध का ठेवतो आहेस असे म्हणून त्यास गैर पद्धतीचे व्यक्ती गोळा करून वायरनी व लाथा बुक्क्यांनी मारहाण केले यात दुर्गेश्वर ठाकूर यांच्या गुप्तांगावर लाथा देण्यात आल्याने त्यांना उलट्या होऊन त्यांचा यात मृत्यू झाला ही घटना दिनांक 3 मार्च रोजी सायंकाळी चारच्या सुमारास थडी सावळी येथे घडल्याचे समजताच मोठी खळबळ उडाली होती ही घटना घडल्याचे समजताच बिलोली येथील उपविभागीय पोलीस अधिकारी श्याम पानेगावकर आणि रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सपोनी विक्रम हराळे यांनी घटनास्थळी भेट देऊन सदरील घटनेचा पंचनामा करून घटनेची पाहणी केले.

रामतीर्थ पोलीस ठाण्यात रवींद्रसिंग हनुमानसिंग ठाकूर उर्फ चव्हाण वय वर्ष 44 राहणार थडी सावळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून या प्रकरणातील 1) पद्मसिंह गंगा सिंह ठाकुर 2) राजू सिंग गंगा सिंग ठाकूर 3) गंगासिंग हनुमानसिंग ठाकूर हे सर्व राहनार थडी सावळी तालुका बिलोली आणि 4) दिलीप सिंह ठाकुर 5) विजय सिंग ठाकूर 6) विशाल सिंह ठाकूर 7) प्रताप सिंग ठाकूर हे सर्व राहनार निर्मल तेलंगणा या सात जणाविरुद्ध रामतीर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आले आहे. या घटनेमुळे थडी सावळी परिसरात तणावपूर्ण शांतता पसरली असून पुढील तपास सुरू पोलीस उपविभागीय अधिकारी श्याम पानेगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी विक्रम हराळे हे करीत आहेत.

धुळीवंदनाच्या दिवशी सर्वत्र रंग उत्सवाची अनेक गावात उधळण होत असताना थडी सावळी येथे ऐन धुळीवंदनाच्या दिवशी एका तरुण युवकाचा अनैतिक संबंधाच्या कारणावरून खुन झाल्याने या गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते मात्र हि घटना रामतीर्थ पोलिसांनी प्रसंगावधान राखून या घटनेची तात्काळ माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देऊन घटनास्थळी धाव घेतल्याने येथील चिघळलेली परिस्थिती रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सपोनी विक्रम हराळे यांच्या कार्य तत्परतेमुळे येथील त्यांना पूर्ण परिस्थिती निवळली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker