मन्याड नदीच्या पाणी पातळीत वाढ जुन्या कुंचेलीला पाण्याचा वेढा 70 नागरीकाना हलवले सुरक्षीत स्थळी…

मोरे मनोहर
किनाळा :- नायगाव तालुक्यातील कुंचेली (जुनी) या गावाला बुधवार व गुरूवारी झालेल्या पावसाने मन्याड नदी धोक्याची पातळी ओलांडल्याने गावाला पुराचा वेडा पडला होता यात सुमारे शंभर नागरीक रात्रभर अडकले असताना रेस्कूमोहीमेत सी.आर.पी जवानाना पाचारण करून पाण्यात आडकलेल्या सुमारे 70 वयोवृद्ध नागरीकाना दि. 29 ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता तीन किलोमीटर अंतरावरून अक्षरशा खांद्यावर उचलून घेऊन सी.आर.पी जवानानी सुरक्षित स्थळी हलविले असल्याने अनेकांच्या घरात पाणी शिरून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले मात्र यात जीवित हानी झाली नसल्याने अनेकांनी सुटकेचा श्वास सोडला.
दोन दिवसा पासून अतिवृष्टी झाल्याने लिबोटी धरणाचे आणि बारूळ धरणाचे पाणी मोठ्या प्रमाणात मन्याड नदीत सोडण्यात आलेले असल्याने मन्याड नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्यामुळे या नदीचे पाणी जुन्या कुंचेलीत शिरले यामुळे जुनी कुंचली हा हा म्हणता सर्व गावाला पाण्याने वेडा घातला यामुळे येथे वास्तव्यास असलेले अनेक नागरिक सैरावैरा धावत होते मात्र अनेक वयोवृद्ध नागरिक हे या आलेल्या पाण्याच्या वेढ्यामुळे गावातच अडकून पडले होते.
गावाला पुराच्या पान्याने वेढा घातल्यामुळे दिनांक 29 ऑगस्ट रोजी नायगाव च्या तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड, आणि रामतीर्थ पोलीस स्टेशनचे सपोनी विक्रम हराळे व पोलीस कर्मचारी घटनास्थळी जाऊन माहिती घेतली असता पाण्याच्या पातळीत वाढ होत असल्याचे दिसून येत असतात या गावाला गेलेल्या पाण्यात सुमारे 70 च्या जवळपास नागरिक असल्याचे दिसून आले. नायगावच्या तहसीलदार यांनी मुदखेड येथील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांना बोलावून घेतले त्या नंतर जवानी जुन्या कुंचेलीत अडकलेल्या वयोवृद्ध नागरिकासह 70 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले.
या वेळी तहसिलदार धम्मप्रिया गायकवाड, केंद्रीय राखीव दलाच्या 28 जवानासह असिस्टंट कमाडर वासुदेव, रामतीर्थ पोलीस स्टेशनचे सपोनी विक्रम हराळे, बिटजमादार जामंबळीकर, प्रकाश बेळीकर हे उपस्थित होते. सुमारे 12 तास गावाला वेढा घातलेल्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांना पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले असल्याने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही मात्र अनेकांच्या घरात पाणी जाऊन घरातील संसार उपयोगी लाखो रुपयांची संसार उपयोगी साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.



