शंकरनगर येथे दोन परीक्षा केंद्रावर पहिल्याच दिवशी इंग्रजी पेपरला ८ विद्यार्थ्यांची दांडी

मोरे मनोहर
किनाळा :- शंकरनगर तालुका बिलोली येथे बारावीच्या
दोन परीक्षा केंद्रावर पहिल्या दिवशी इंग्रजीच्या पेपरला ८ विद्यार्थ्यांनी दांडी मारली तर ६४३ विद्यार्थ्यांनी कॉफी मुक्त सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा निगराणीखाली सुरळीतपणे परीक्षा दिले.
शंकरनगर येथील श्री साईबाबा विद्यालय आणि भास्करराव बापूराव पाटील खतगावकर पब्लिक स्कूल या दोन शाळेचे एकूण 311 विद्यार्थी हे परीक्षेला बसलेले असताना श्री साईबाबा विद्यालयातील परीक्षा केंद्रावर सुमारे ३०६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिले तर या परीक्षा केंद्रावर पाच विद्यार्थ्यांनी पहिल्याच दिवशी इंग्रजी पेपरला दांडी मारली.
शंकरनगर येथील श्री साईबाबा विद्यालयातील बारावी परीक्षेचे केंद्रप्रमुख म्हणून प्रा. किशन गायकवाड हे काम पाहत असुन परीक्षेच्या पहिल्या दिवशी इंग्रजी पेपरला बैठे पथक प्रमुख लोलमवाड हे उपस्थित होते या परीक्षा केंद्रास उपशिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद नांदेड अवधूत गंजेवार हे जिल्हा भरारी पथक प्रमुख म्हणून केंद्रास भेट देऊन पाहणी केले.
तर संत ज्ञानेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात असलेल्या परीक्षा केंद्रावर संत ज्ञानेश्वर विद्यालय आणि बेटमोगरा येथील बळीराम पाटील विद्यालयाचे विद्यार्थी अशा या दोन शाळेतील २४० विद्यार्थी परीक्षेस बसलेले असताना या परीक्षा केंद्रावर पहिल्या दिवशी इंग्रजी पेपरला २३७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून तिन विद्यार्थी गैरहजर होते येथील परीक्षाकेंद्राचे केंद्रप्रमुख म्हणून प्रा. दिलीप मोरे
हे काम पाहत आहेत.
शंकरनगर येथील संत ज्ञानेश्वर विद्यालयाच्या परीक्षा केंद्रास परीक्षेच्या पहिल्याच दिवशी जिल्हा भरारी पथक प्रमुख म्हणून जिल्हा पाणीपुरवठा अधिकारी जिल्हा परिषद नांदेड, उपशिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद नांदेड श्री अवधूत गंजेवार, नायगाव नगर परिषदेच्या सिओ गांधारी पवार यांनी केंद्रास भेटी देऊन परीक्षाकेंद्राची पाहणी केले या केंद्रावर बैठे पथक प्रमुख म्हणून मंडळ अधिकारी पवार यांनी काम पाहिले.
दि.१० फेब्रुवारी रोजी चालू झालेल्या बारावीच्या परीक्षेच्या पहिल्या दिवशी असलेल्या इंग्रजी पेपरला शंकरनगर येथील दोन परीक्षा केंद्रावरील एकूण आठ विद्यार्थ्यांनी दांडी मारली असून दोन परीक्षा केंद्रावर एकूण ६४३ विद्यार्थ्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा निगराणीखाली कॉफीमुक्त सुरळीत परीक्षा दिले असून जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली येथील दोन्ही परीक्षा केंद्रावर रामतीर्थ पोलीस ठाण्याचे सपोनि विक्रम हराळे यांनी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवले असुनकॉपीमुक्त वातावरणात या परीक्षा घेतल्या जात आहेत.



