ताज्या बातम्यानांदेडनायगांव
ग्रामीण रुग्णालय नायगाव येथे संदर्भ सेवा शिबिर संपन्न

New Bharat Times नेटवर्क
नायगाव :- दि.17 फेब्रुवारी 25 रोजी ग्रामीण रूग्णालय नायगाव येथे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत संदर्भसेवा शिबिर आयोजित करण्यात आले होते.
सदर शिबिरात डॉ.प्रशांत सोनकांबळे, डॉ.इरफान पठाण, डॉ.किशन नाईक, डॉ.योगेश अडबलवार, डॉ.प्रवीण अंभोरे, श्री.कसबे यांनी वैद्यकीय अधिक्षिका डॉ.अपर्णा पुपलवाड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निळकंठ भोसीकर यांचे मार्गदर्शना खाली 93 बालकांची तपासणी करण्यात आली.
आवश्यक बालकांवर रक्त तपासणी, X RAY काढून औषधोपचार करण्यात आले व 17 बालकांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात संदर्भित करण्यात आले.
सदर शिबिरास वैद्यकीय अधिकारी डॉ.सुनील वाघमारे, डॉ.शिवाजी बिडवई, डॉ.अविनाश कोठाळकर, डॉ.प्रियांका गजले, डॉ.तृप्ती बिरादार व RBSK कर्मचारी उपस्थित होते.