चाकू हल्यात भोसी येथील तरुणाचा मृत्यू : भोकर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद

New Bharat Times नेटवर्क
नांदेड : जुन्या भांडणाच्या वादातून भोकर तालुक्यातील भोसी येथील एका तरुणाला चाकुने भोसकल्याची घटना दि. 31 मार्च रोजी घडली. उपचार सुरु असतांना गंभीर जखमी तरुणाचा बुधवारी दि. 1 एप्रिल रोजी मृत्यू झाला. सदर प्रकरणी भोकर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
भोकर तालुक्यात नांदेड रोडवर भोसी हे गाव असून येथील अक्षय देशमुख याचे “विहान” पानपट्टी समोर दि. 31 मार्च रोजी आदित्य काशीनाथ डुब्बेवाड( वय २३ रा.शेबोली ता.मूदखेड) हा तरुण उभ टाकला होता. रात्री 8 वाजताच्या दरम्यान अचानक अभिजीत प्रभाकर कल्याणकर ( रा.भोसी ता.भोकर) व त्याचे सोबत एक अन्य एकजन मोटारसायकलवर आले.
आणि काही कळण्याच्या आतच पानपट्टी समोर उभ असलेल्या आदित्य डुब्बेवाड यांच्यावर सपासप चाकूने वार केला आणि घटनास्थळावरुन पळ काढला. झालेल्या चाकू हल्ल्यात अदित्य गंभीर जखमी झाला असल्याने त्यास तातडीने पुढील उपचारासाठी नांदेडला दाखल करण्यात आले.
उपचारादरम्यान आदित्य काशीनाथ डुब्बेवाड यांचा दि. 1 एप्रिल रोजी मृत्यू झाला. सदर प्रकरणी मयत तरुण अक्षय यांचे वडील काशीनाथ पोतन्ना डुबेवाड यांनी जुन्या वादातून अभिजीत प्रभाकर कल्याणकर व अन्य एकाने धारधार शस्त्राने वार करुन माझ्या मुलाचा खुन केला असल्याची तक्रार भोकर पोलीस ठाण्यात दिली. तक्रारीवरुन गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अजित कुंभार करीत आहेत.



