कंधारगावाकडच्या बातम्यानांदेड

काळाचा क्रूर घाला: मुलाच्या मृत्यूच्या धक्क्याने पित्यानेही सोडले प्राण ; फुलवळ गावावर शोककळा

ॲड.उमर शेख

कंधार : -नियतीचा खेळ अत्यंत क्रूर असतो, याची प्रचिती कंधार तालुक्यातील फुलवळ येथे आली. अल्पशा आजाराने ४३ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, पित्याला हा विरह सहन झाला नाही. मुलाच्या निधनानंतर अवघ्या चार तासांतच ७० वर्षीय पित्यानेही प्राण सोडले. या मायलेकांच्या एकाच वेळी झालेल्या निधनामुळे संपूर्ण फुलवळ गावावर शोककळा पसरली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, फुलवळ येथील हुसेन काशीम निचलकर (वय ४३) हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असतानाही ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी रात्रंदिवस कष्ट करत होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र नियतीला काही वेगळेच मान्य होते. बुधवार, १ एप्रिल रोजी दुपारी २ च्या सुमारास हुसेन यांची प्राणज्योत मालवली.

​हुसेन यांच्या निधनाची बातमी त्यांचे वडील काशीम लालासाब निचलकर (वय ७०) यांना समजताच त्यांना मोठा धक्का बसला. वयोपरत्वे थकलेल्या काशीम यांना पोटच्या मुलाचा विरह सहन झाला नाही. मुलाच्या निधनानंतर अवघ्या चार तासांतच, म्हणजेच सायंकाळी ६ वाजता काशीम निचलकर यांचेही निधन झाले. मुलापाठोपाठ बापानेही जगाचा निरोप घेतल्याने निचलकर कुटुंबावर आभाळ कोसळले आहे.

​रात्री उशिरा बाप-लेकावर हजारो नागरिकांच्या उपस्थितीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. एकाच वेळी दोन सरण रचलेले पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, एक सून आणि दोन बहिणी असा परिवार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker