अवैध शस्त्र बाळगणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात

अंकुशकुमार देगावकर
नायगाव : अवैध शस्त्र बाळगणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने (ता.३१) रोजी ताब्यात घेतले असून. त्यांच्यावर रात्री उशिरा नायगाव पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३/२५, ७/२५ तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, काही इसम अवैधरित्या गावठी पिस्टल विक्रीच्या उद्देशाने थांबले असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून १) प्रल्हाद उर्फ सोनू पंढरी गायकवाड (रा. टाकळी त.मा, ता. नायगाव) २) रवि धोंडिबा देवकांबळे (वय २१, रा. महात्मा फुले कॉलनी, नायगाव यांना ताब्यात घेण्यात आले तर तिसरा व विनायक जांभळीकर रा पुणे हा फरार झाला आहे.
अटक केलेल्यांच्या अंगझडतीत एक गावठी पिस्टल जप्त करण्यात आले. आरोपींकडून एक गावठी पिस्टल जप्त करण्यात आले असून, त्याची अंदाजे किंमत ३० हजार रुपये आहे. ही कारवाई दि.३१ मार्च २०२६ रोजी नायगाव जवळील कंडाळा फाटा परिसरात करण्यात आली.
या प्रकरणी नायगाव पोलीस पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३/२५, ७/२५ तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील व सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांच्या नेतृत्वाखाली पार पडली.
या मोहिमेत उपनिरीक्षक साईनाथ पुवड तसेच स्थानिक गुन्हे शाखा व सायबर सेलच्या पथकाचा सहभाग होता. या धडक कारवाईबद्दल पोलीस अधिक्षकांनी कौतुक केले असून. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक निरिक्षक तोटेवार हे करत आहेत.



