लिफ्ट इरिगेशन करून हिप्परगा माळ येथील शेतकऱ्यांना पाणी पुरवठा करण्याच्यादृष्टीने पाटबंधारे विभागाकडून पहाणी

मोरे मनोहर
किनाळा :- हिप्परगा माळ तालुका बिलोली येथील शेतकऱ्यांच्या शेतीला पाण्यासाठी सिंचनाची कसलीही व्यवस्था नसल्याने येथील शेतकऱ्यांना निसर्गाच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागते यामुळे येथील शेतकऱ्यावर शेतीच्या आर्थिक नुकसानीमुळे अनेक शेतकऱ्यावर आत्महत्या करण्याची वेळ येत आहे यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी कॅनॉल मंजूर करावे अशी मागणी येथील सरपंच तिरुपती पाटील डाकोरे यांनी राजाचे जलसंधारण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली असता त्यांच्या या मागणीची दखल घेऊन 17 सप्टेंबर रोजी हिप्परगा माळ येथे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांने शेतकऱ्यांशी संवाद साधुन तळणी प्रकल्पातून लिफ्टद्वारे येथील शेतकऱ्यांना पाणीपुरवठा करण्यात येईल यासाठी शासनाकडे लवकरच प्रस्ताव पाठवण्यात येईल असे आश्वासन दिले.
हिप्परगा माळ गावापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावरून गावाच्या दोन्ही दिशेने बारूळ धरणाचे दोन कॅनॉल गेलेले असून ह कॅनॉल येथील शेतकऱ्यांना कसलाही फायदा होत नसल्याने या कॅनॉलचे पाणी हिप्परगा माळ येथील शेतकऱ्यांना घेता यावे यासाठी हे कॅनॉल मंजूर करावे अशी मागणी येथील सरपंच तिरुपती पाटील डाकोरे यांनी राज्याचे जलसंधारण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे 5 जुलै 2025 रोजी भेट घेऊन मागणी केली असता त्यांच्या या मागणीची जलसंधारण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तात्काळ दखल घेऊन येथील शेतकऱ्यांच्या शेतीसाठी पाण्याची व्यवस्था करण्याच्या दृष्टीने सूचना केल्याने त्यांच्या आदेशानुसार पाटबंधारे विभागाकडून 17 सप्टेंबर रोजी प्रार्थमिक पाहणी करण्यात आली
17 सप्टेंबर रोजी कॅनलचा प्राथमिक अहवाल घेण्यासाठी नायगाव पाटबंधारे विभागाचे Dy पवार साहेब, सहाय्यक अभियंता सावंत साहेब व स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक कोंकेवार साहेब व बारस्कर साहेब यांनी गावामध्ये येऊन गावकऱ्यांशी संवाद साधुन प्रत्यक्ष पाहणी करून तळणी प्रकल्पातून लिफ्टद्वारे येथील शेतकऱ्यांना पाणीपुरवठा करण्यात येईल यासाठी शासनाकडे लवकरच प्रस्ताव पाठवण्यात येईल असे आश्वासन दिले.यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांचा सरपंच तिरुपती पाटील डाकोरे व गावकऱ्यांच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
हिप्परगा माळ येथील शेतकऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी राजाचे जलसंधारण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे बिलोली देगलूर विधानसभेचे आमदार जितेश भाऊ अंतापुरकर यांच्या पाठपुराव्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळाला यामुळे शेतकऱ्यांनी व गावकऱ्यांनी त्यांचे
मनापासून आभार व्यक्त केले.



