ताज्या बातम्यानांदेडनायगांव

चोरी व घरफोडी रोखण्यासाठी नायगाव पोलिसांची 12 कलमी मार्गदर्शक सूचना जारी

प्रकाश महिपाळे

नायगाव : सुट्या व सणासुदीच्या काळात वाढणाऱ्या चोरी आणि घरफोडीच्या घटनांना आळा घालण्यासाठी नायगाव पोलीस स्टेशनने नागरिकांसाठी 12 कलमी सुरक्षा मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या ‘सतर्क नागरिक – सुरक्षित परिसर’ या मोहिमेंतर्गत पोलीस नागरिकांमध्ये जनजागृती करत आहेत.

पोलीस निरीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेकदा नागरिकांच्या निष्काळजीपणामुळे चोरांना संधी मिळते. त्यामुळे घर बंद करताना सर्व दरवाजे-खिडक्या व ग्रील व्यवस्थित लॉक करावेत. घर दीर्घकाळ बंद ठेवायचे असल्यास विश्वासू शेजारी किंवा नातेवाईकांना माहिती द्यावी. सोशल मीडियावर प्रवासाची माहिती सार्वजनिक करणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

घराच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे व पुरेशी लाईट व्यवस्था ठेवावी. अनोळखी व्यक्तींना घरात प्रवेश देण्यापूर्वी ओळख पटवावी. मौल्यवान दागिने, रोख व कागदपत्रे सुरक्षित लॉकरमध्ये ठेवावीत. रात्रीच्या वेळी मुख्य दरवाजाजवळ सुरक्षा दिवे सुरू ठेवावेत.

संशयास्पद हालचाल दिसल्यास त्वरित पोलिसांना माहिती द्यावी. घरकाम करणारे नोकर, भाडेकरू व कामगार यांची पोलीस पडताळणी करून घ्यावी. वाहन सुरक्षित ठिकाणी पार्क करून लॉक करावे व सुरक्षा साधनांचा वापर करावा. शेजाऱ्यांमध्ये परस्पर संपर्क ठेवून “नेबरहुड वॉच” पद्धतीने सतर्कता राखावी. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी त्वरित 112 या टोल फ्री क्रमांकावर किंवा नायगाव पोलीस स्टेशन – 02462-222033 येथे संपर्क साधावा असे आवाहन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker