ताज्या बातम्यानांदेडमहाराष्ट्र

धर्माबादमध्ये भीम आर्मीला मोठे खिंडार ; कार्यकर्त्यांचा ‘वंचित बहुजन आघाडी’त जाहीर प्रवेश!

नांदेड : नांदेड दक्षिण जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यात वंचित बहुजन आघाडीने मोठी राजकीय मुसंडी मारली आहे. भीम आर्मीचे माजी तालुकाध्यक्ष मिलिंद प्रकाश सोनकांबळे यांच्या पुढाकाराने आणि मौजे माष्टी येथील संपूर्ण बौद्ध बांधवांसह भीम आर्मीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी आज वंचित बहुजन आघाडीमध्ये (VBA) जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेशामुळे तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

धर्माबाद येथील ‘आर्य भवन’ येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जनसंवाद आणि पक्षप्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष शंकर महाजन हे होते.

या सोहळ्याला वंचित बहुजन आघाडीच्या युवा प्रदेश सदस्या आकाश बनसोड, जिल्हा उपाध्यक्ष अरुण भद्रे, युवा जिल्हा संघटक संदेश गायकवाड, जिल्हा सदस्य प्रकाश कोल्हे, जे. के. जोंधळे सलागर, माजी तालुकाध्यक्ष एकनाथ जिंकले, माजी तालुका महासचिव गौतम देवके, तालुका संघटक चांदोबा वाघमारे, युवा तालुकाध्यक्ष कपिल वाघमारे, शहराध्यक्ष रोहित रमटक्के, भा. बो. मा. स. चे तालुकाध्यक्ष कैलास डुमने, सुभाष कांबळे आदी जिल्हा व तालुका पातळीवरील प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

भीम आर्मीचे माजी तालुकाध्यक्ष मिलिंद प्रकाश सोनकांबळे यांच्या नेतृत्वाखाली मौजे माष्टी येथील दीपक मारोतराव कांबळे, संदीप दिगंबर सूर्यवंशी, अविनाश गोविंद कांबळे, रवी मनोहर कांबळे, उजलाजी धर्माजी सोनकांबळे, विकास उजलाजी कांबळे, सुनील पिराजी सोनकांबळे, पंडित गोविंद कांबळे, बालाजी पिराजी सोनकांबळे, गणेश चंदू सोनकांबळे, माधव पुंडलिक सोनकांबळे, व्यंकट मारोती सोनकांबळे, सोनबा निवृत्ती सोनकांबळे, पांडुरंग शंकर सोनकांबळे, देविदास शंकर सोनकांबळे, अतुल विठ्ठल कांबळे, विलास दिगंबर कांबळे, दिलीप दिगंबर कांबळे यांनी ‘वंचित’चा झेंडा हाती घेतला.

तसेच नितीन भालके, संदीप वाघमारे, संजय निदांकर, भय्या वाघमारे, रविकिशन वाघमारे, संदीप सूर्यवंशी मस्टिकार, भारत जोंधळे पांगरी, किरण हणमंते, प्रमोद विकास लांडगे, शामराव लोखंडे, भारतरत्न जोंधळे, सुरेश हणमंते, दिगंबर झपटे, दयानंद लाव्हाले, दिलीप मोटेवर, लक्ष्मण जिंकले, अंकुश वाघमारे, दिलीप कांबळे, प्रवेश वाघमारे, साहेबराव कांबळे, राजू सोनकांबळे आणि भगत राहेर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी अधिकृतपणे वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. उपस्थित मान्यवरांनी पक्षाचा शेला देऊन सर्व नवप्रवेशितांचे स्वागत केले.

कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन माजी तालुका महासचिव गौतम देवके यांनी केले, तर उपस्थितांचे आभार माजी तालुकाध्यक्ष एकनाथ जिंकले यांनी मानले. या मोठ्या पक्षप्रवेशामुळे धर्माबाद तालुक्यात वंचित बहुजन आघाडीची ताकद कमालीची वाढली असून, कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker