उमरी येथील माजी नगरसेवक सोनू वाघमारे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश

नांदेड:- वंचित बहुजन आघाडीचे श्रध्देय नेते बाळासाहेब आंबेडकर आणि युवा नेते सुजात दादा आंबेडकर यांच्या ध्येय-धोरणांवर आणि कार्यावर प्रेरित होऊन उमरी (जि. नांदेड) येथील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उमरी नगरपालिकेचे माजी नगरसेवक सोनू वाघमारे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी अधिकृतपणे वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश केला. या मोठ्या पक्षप्रवेशामुळे उमरी तालुक्यात वंचित बहुजन आघाडीची ताकद कमालीची वाढली आहे.

नांदेड येथे पार पडलेल्या या भव्य पक्षप्रवेश सोहळ्याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे अनेक वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने:
अक्षय बनसोडे (प्रदेश सदस्य, युवा आघाडी राज्य कार्यकारिणी)
शंकर महाजन (नांदेड दक्षिण जिल्हाध्यक्ष, वंचित आघाडी), रवि पंडित (जिल्हा महासचिव), विनायक गजभारे (जिल्हा उपाध्यक्ष), गणपत सोनकांबळे (जिल्हा उपाध्यक्ष), जयपाल ढवळे (कायदेविषयक सल्लागार), वैभव लष्करे (युवा जिल्हा महासचिव), गोपालसिंग टाक (युवा शहराध्यक्ष)
सिद्धोधन कापसीकर (शहर महासचिव) यांसह इतर प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
माजी नगरसेवक सोनू वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली उमरी तालुक्यातील विविध संघटनांच्या पदाधिकार्यांनी आणि कार्यकर्त्यांनी ‘वंचित’चा झेंडा हाती घेतला. पक्षप्रवेश करणाऱ्यांमध्ये युवा पॅंथरचे तालुकाध्यक्ष सचिन खंडलोटे, गंगाधर गच्चे, राजू सरोदे, अनिल हैबते, लक्ष्मण खंदारे, राहुल खंदारे, वैभव गायकवाड, पपडी लोखंडे, अशोक खंडलोटे, संजय डोंगरे, बाबुराव कांबळे, नागनाथ खंडलोटे, सुरेश खंडलोटे, दीपक गायकवाड, सौरभ वाघमारे, तुषार वाघमारे, सुशांत वाघमारे यांच्यासह शेकडो सक्रिय कार्यकर्त्यांचा समावेश आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने उपस्थित सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे आणि कार्यकर्त्यांचे गुलाबपुष्प देऊन पक्षात जंगी स्वागत करण्यात आले. आगामी काळात उमरी तालुका आणि नांदेड जिल्ह्यात पक्षाचे संघटन अधिक मजबूत करून वंचित, शोषित घटकांच्या न्याय-हक्कासाठी जोमाने काम करण्याचा संकल्प या वेळी नूतन सदस्यांनी व्यक्त केला. या पक्षप्रवेशामुळे स्थानिक राजकारणात वंचित बहुजन आघाडीने मोठी आघाडी घेतल्याचे बोलले जात आहे.



