कुंटूरच्या महाराष्ट्र ग्रामीण बँक मॅनेजर भीमराव सोनकांबळे यांची बदली ; करडकडा येथे नवीन नियुक्ती
संविधान प्रत अन् तथागतांची मूर्ती भेट; कुंटूरमध्ये बँक मॅनेजर भिमराव सोनकांबळे यांचा नागरी सत्कार

प्रकाश महिपाळे
नायगाव :- येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे शाखा व्यवस्थापक भिमराव मनोहर सोनकांबळे यांची परभणी जिल्ह्यातील करडकडा येथे बदली झाली आहे. त्यानिमित्त कुंटूर येथील बँक शाखेत व ग्रामस्थांच्या वतीने त्यांना जड अंतःकरणाने निरोप देण्यात आला. त्यांनी कुंटूर शाखेत ३ वर्षे, २ महिने आणि ११ दिवस अत्यंत उल्लेखनीय व ग्राहकाभिमुख सेवा दिली. आज दिनांक ६ जून २०२६ रोजी त्यांचा हा निरोप समारंभ संपन्न झाला.

कार्यक्रमात प्रकाश महिपाळे यांच्या हस्ते व्यवस्थापक भिमराव सोनकांबळे यांना ‘भारतीय संविधानाची प्रत’ देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच समस्त कुंटूर ग्रामस्थ व बँक खातेदारांच्या वतीने त्यांना ‘तथागत गौतम बुद्धांची मूर्ती’ भेट देऊन त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
या निरोप समारंभाला बँकेचे कॅशियर सुमीत दीक्षित, रोहित पाटील व नागेश कासराळीकर प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच कुंटूर गाव व परिसरातील अनेक प्रतिष्ठित खातेदार व नागरिक आवर्जून उपस्थित होते.
उपस्थित मान्यवर बालाजी कदम (कारभारी), प्रकाश जाधव (सातेगाव), रावसाहेब कदम, ज्ञानेश्वर निलेवार, शंकर आलगुलवार, सुनील तोडे, कल्यापुरे, बालाजी लक्ष्मण हनमंते, गजानन संगेवार, गणेश बालाजी शिंदे (मेळगाव), पवन महाजन, रमेश मामीडवार, नरेश मामीडवार, राजेश नालीकंठे, गणेश शिंदे व इतर.
भिमराव सोनकांबळे यांनी आपल्या कार्यकाळात सर्वसामान्य खातेदारांना नेहमीच मोलाचे सहकार्य केले. त्यांची बदली झाल्याने कुंटूर परिसरातील ग्राहकांनी त्यांच्या कामाप्रती कृतज्ञता व्यक्त केली व त्यांना अत्यंत भावुक वातावरणात निरोप दिला.



