ताज्या बातम्यानांदेडमहाराष्ट्र

मॉरिशस येथील सातव्या आंतरराष्ट्रीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी देवीदास फुलारी

New Bharat Times नेटवर्क

नांदेड :- महात्मा गांधी इन्स्टिट्यूट मॉरिशस आणि स्नेहल आर्ट्स अँड एज्युकेशन सोसायटी डोंबिवली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सातव्या आंतरराष्ट्रीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्षपदी येथील साहित्यिक देवीदास फुलारी यांची निवड झाल्याचे संमेलन आयोजक प्रा. कल्पना गवरे यांनी कळवले आहे. मॉरिशस येथील महात्मा गांधी इन्स्टिट्यूटच्या सभागृहात हे संमेलन गुरुवार दिनांक 25 जून 2026 रोजी आयोजित केले आहे.

ग्रंथदिंडी, उद्घाटन सोहळा, परिसंवाद, चर्चासत्र, गझल मुशायरा, कवी संमेलन, पुस्तक प्रकाशन इत्यादी भरगच्च कार्यक्रम या संमेलनात पार पडणार आहेत. मॉरिशस येथील मराठी भाषिक विद्यार्थी, शिक्षक, अभ्यासक आणि रसिकांची लक्षणीय उपस्थिती या संमेलनात राहणार असल्याचे नियोजन समितीचे अध्यक्ष रवींद्र सोनवणे यांनी कळवले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker