भाविकांनी किर्तन सोहळ्याचा लाभ घ्यावा – खा. रवींद्र चव्हाण

प्रभाकर लखपत्रेवार
नायगाव : नांदेड जिल्ह्याचे लोकनेते, स्वर्गीय खासदार वसंतराव बळवंतराव चव्हाण यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त नायगाव येथे भक्ती, अध्यात्म आणि सामाजिक एकतेचा सुंदर संगम घडवून आणणाऱ्या भव्य कीर्तन सोहळ्याचे आयोजन दि. २६ आँगष्ट रोजी सकाळी करण्यात आले असून. किर्तन सोहळ्यानंतर दुपारी १२ ते ५ पर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून किर्तन सोहळा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असा आवाहन खा.प्रा. रवींद्र चव्हाण यांनी केले आहे.
द्वितीय पुण्यस्मरणाच्या सोहळ्याच्या तयारीसाठी दि. २२ आँगष्ट रोजी खा. प्रा. रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत कृषी महाविद्यालयाच्या मैदानात व्यापक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला केशवराव पा. चव्हाण, माजी जिल्हा परिषद सदस्य माधवराव बेळगे, हनमंतराव चव्हाण, आनंदराव चव्हाण, श्रीनिवास चव्हाण, वसंत मेडेवार, विजय चव्हाण, विनोद गंदेवार, सतीश मेडेवार, गंगाधर पाटील बेलकर, गटनेते सुधाकर शिंदे, श्रीनिवास जवादवार, राम मद्रेवार, बाबासाहेब शिंदे, संजय बेळगे, पोलीस उपनिरीक्षक निरिक्षक गजानन तोटावार, सुरेश पा. कल्याण, श्रीधर चव्हाण, सचिन चिद्रावार, साईनाथ वट्टमवार, नगरसेवक शिवाजी कल्याण, पवन गादेवार, एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाखेचे प्राचार्य, प्राध्यापक, नायगाव शहरातील नगरसेवक, व्यापारी, प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बुधवार, दि. २६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता दिवंगत खा. वसंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याचे पुजन १० ते १२ या वेळेत वसंत स्मृती कृषी महाविद्यालय, नायगाव (बा.), जि. नांदेड येथे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार युवाकिर्तीवीर ह.भ.प. श्री ज्ञानेश्वर माऊली पठाडे यांचे हरिनामाचे कीर्तन होणार असून, त्यांच्या ओघवत्या वाणीतील प्रबोधनातून भाविकांना अध्यात्मिक आणि सामाजिक संदेश मिळणार आहे. पंचक्रोशीतील गायक, वादक, भजनी मंडळे तसेच असंख्य भाविकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम भक्तिमय वातावरणात संपन्न होणार आहे.
कीर्तन श्रवणासह दुपारी १२ तो ५ वाजेपर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी किर्तन आणि महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन खा. रविंद्र वसंतराव चव्हाण, लोकसभा सदस्य, नांदेड तसेच चव्हाण परिवार व समस्त गावकरी मंडळी, नायगाव (बा.) यांच्या वतीने करण्यात आले आहे.
लोकनेते वसंतराव चव्हाण यांनी आपल्या आयुष्यभर जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी संघर्ष केला. साधेपणा, माणुसकी आणि सर्वसामान्यांशी असलेली आपुलकी यामुळे त्यांनी जनमानसात अढळ स्थान निर्माण केले. त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आयोजित करण्यात आलेला हा कीर्तन सोहळा त्यांच्या विचारांना अभिवादन करणारा ठरणार आहे.



