राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत ठाणे, मुंबईच्या खेळाडूंनी गाजविले मैदान : महापौरांच्या हस्ते बक्षिक वितरण थाटात संपन्न

New Bharat Times नेटवर्क
नांदेड : महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या अंतर्गत नांदेड जिल्हा बॅडमिंटन संघटनेच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेचे बक्षिक वितरण थाटात पार पडले. यावर्षीच्या 22 व्या राज्यस्तरीय स्पर्धेत ठाणे , मुंबई च्या खेळाडूंचा वरचमश्मा राहिला. विजेत्या स्पर्धांना नांदेडच्या महापौर सौ. कविता मुळे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
स्व.शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त नांदेड जिल्हा बॅडमिंटन संघटनेतर्फे सलग २२ वर्षांपासून या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. सलग २२ वर्षे राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करणारी नांदेड जिल्हा बॅडमिंटन संघटना देशातील पहिली जिल्हा संघटना असल्याचा मान संघटनेला मिळाला आहे.
या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष तथा माजी पालकमंत्री डी. पी. सावंत यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. राज्यभरातून तब्बल 270 खेळाडूंनी यावर्षीच्या स्पर्धेत सहभाग घेतला होता. प्रत्येक सामना अत्यंत चुरशीचा आणि अटीतटीचा झाला. आज अंतिम लढती झाल्या नंतर विजेत्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
यावर्षी झालेल्या स्पर्धेत सवेश यादव (ठाणे)याने पुण्याच्या ऋषभ देशपांडे याच्यावर १५-९ : १५-१० अशी मात करत अजिंक्य पद जिंकले. पुरुष आणि महिला दुहेरीत ऋचा सावंत आणि सिया सिंह (पुणे/ठाणे) यांनी नागपूर अनघा करडीकर आणि नेहल गोसावी (ठाणे/नागपूर) यांच्यावर १५-११ : १५-१० अशा फरकानी विजय मिळविला. प्रत्येक सामना हा अत्यंत चुरशीच ठरला. मुलींच्या एकेरी सामन्यात पुण्याच्या श्रुती मुंदडा हिने पुण्याच्याच साद धर्माधिकारी हिच्या विरुद्ध १५-१४ : १५-१०असा सामना जिंकला.
मुलाचं दुहेरी स्पर्धेत विप्लव कुळवे आणि विराज कुळवे बंधूनी (ग्रेटर मुंबई) यांनी ठाण्याच्या अर्जुन बीरजादार आणि अयान बीरजादार बंधूंवर ९-१५ : १५-१२ अशा फरकाने सामना जिंकला.तर मुला मुलींच्या दुहेरी सामन्यात अमन फारोख सामीय आणि अनागत करडीकर (ठाणे) यांनी सवेश यादव + नेहल गोसावी (ठाणे) यांच्यावर १५-७ : १५-८ अशी मोठ्या फरकानी मात करत सामना एकतर्फी जिंकला. या विजेत्यांना रोख रक्कम, ट्रॉफी, प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
यावेळी महापौर कविता मुळे , महाराष्ट्र बॅडमिंटन असोशियांचे सॉलेक्ट्रर रेड्डी, मुख्य पंच पारिजात नातू , सचिव महेश वाकरडकर , उपाध्यक्ष बी. के. मोहन, सहसचिन मोहन गुप्ता यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढच्या वर्षीची स्पर्धा याहून भव्य घेण्याचा संकल्प संयोजकांनी केला आहे.



