ताज्या बातम्यानांदेडबिलोली

सर्वच राजकीय पक्षांनी कुंडलवाडी नगराध्यक्ष पदासाठी खुल्या प्रवर्गातील व्यक्तीस उमेदवारी देऊन न्याय द्यावे

◆कुंडलवाडी शहरातील नागरिकांचा सूर

कुंडलवाडी :- कुंडलवाडी नगरपरिषद नगराध्यक्ष हे खुल्या प्रवर्गासाठी सुटले असून सर्वच राजकीय पक्षांनी नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देताना खुल्या प्रवर्गातील व्यक्तीस उमेदवारी देऊन न्याय द्यावे असा सूर नागरिकांमधून व्यक्त होत आहे. आगामी काळात कुंडलवाडी नगरपालिकेची निवडणूक पार पडणार असून यासाठी निवडणूक आयोगाकडून पूर्वतयारी करण्यात येत आहे.

यातच राजकीय पक्षांनीही निवडणुकीची तयारी सुरू केली असून कुंडलवाडी चे नगराध्यक्ष पद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षण सोडतील सुटले आहे. गत २० वर्षानंतर कुंडलवाडी चे नगराध्यक्ष खुल्या प्रवर्गासाठी सुटल्याने या ठिकाणी खुल्या प्रवर्गातीलच उमेदवारास सर्वच राजकीय पक्षांनी उमेदवारी द्यावी अशी मागणी कुंडलवाडी शहरातील नागरिकांमधून होत आहे.

आरक्षित असलेल्या प्रवर्गाला जर नगराध्यक्षपद सुटले असते तर आरक्षित प्रवर्गातील व्यक्तीसच त्या ठिकाणी नगराध्यक्ष पदासाठी उभे राहिले असते पण आरक्षित जागेवर खुल्या व्यक्तीस निवडणूक रिंगणात उतरता येत नाही त्यासाठी नगराध्यक्ष पद खुल्या प्रवर्गात सुटल्याने खुल्या प्रवर्गातील व्यक्तीसच उमेदवारी देऊन सर्वच राजकीय पक्षांनी खुल्या प्रवर्गाला न्याय द्यावे असा सूर कुंडलवाडी शहरातील नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker