ताज्या बातम्यानांदेडनायगांव

तिर्रट खेळणाऱ्या दहा जुगाऱ्यांना नायगाव पोलिसांनी पकडले : दोन लाखाचा मुद्देमाल जप्त

अंकुशकुमार देगावकर

नायगाव : देगावकडे जाणाऱ्या कँनल रोडवर नायगाव शिवारातील वाघदेव मंदिराजवळ तिर्रट जुगार खेळणाऱ्या दहा जुगाऱ्यांना नायगाव पोलीसांनी धाड टाकून अटक केली असून. नगदी १२ हजार ७०० व चार मोटारसायकली असा एकून दोन लाख १९ हजार १३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मागील काही दिवसापासून नायगाव परिसरातील शेतात लपूनछपून जुगार खेळण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले होते. पोलीसांना सापडू नये यासाठी काही तरुण दररोज जागा बदलून जुगाराचा डाव मांडत होते. या जुगाऱ्यांना काहीजन पाठींबा देत होते. नायगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस यंत्रणेला थांगपत्ता न लागू देता लपूनछपून जुगार अड्डे सुरु असल्याची माहिती पोलीस निरीक्षक एस.एन. मारकड यांना मिळाली होती पण जुगारी दररोज जागा बदलत असल्याने पकडण्यात अडचणी येत होत्या. गुरुवारी मात्र नायगांव शिवरात नायगांव ते देगांव जाणारे कॅनल रोडवरील वाघ मंदीर जवळ तिरट नावाचा जुगार खेळण्यात येत असल्याची माहिती मिळाली.

मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलीस जमादार साई सांगवीकर चरकुलवार, पोलीस कर्मचारी शिंदे, होमगार्ड खुजडे, दासरवाड, पांचाळ, बरबडे, घंटेवाड इत्यादींनी नायगांव ते देगांव जाणारे कॅनल रोडवरील वाघ मंदीर जवळ तिरट नावाच्या जुगावारावर धाड टाकली. यावेळी शिवाजी संभाजी चव्हाण, सुभाष गोविंदराव उप्पे, बालाजी व्यंकटराव कानुले, गणपत संभाजी तिरटवाड, मनोज मारोतीराव बोमनाळे, गोविंद माधवराव कल्याण, बालाजी गंगाधर वाघमारे, सुदाकर गणपती होटकर, बालाजी विठल शिर्के, मनोज आनंदराव जांभळे इत्यादी तिर्रट जुगार खेळत असल्याचे आढळून आले. या सर्व जुगाऱ्यांना ताब्यात घेण्यात आले आणि त्यांची वरात पोलीस ठाण्यात आणण्यात आली. छापा टाकलेल्या ठिकाणी नगदी १२ हजार ७०० व चार मोटारसायकली असा एकून दोन लाख १९ हजार १३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सदर प्रकरणी साई सांगवीकर यांच्या फिर्यादीवरून दहा जुगाऱ्यांच्या विरोधात नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून तपास पोलीस जमादार गंधपवार हे करत आहेत. अनेक दिवसानंतर नायगाव पोलिसांनी कारवाई करुन नायगाव शहरातील दहा जुगाऱ्यांना पकडल्याने खळबळ उडाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker