ताज्या बातम्यानांदेडबिलोली

भारतीय संविधान प्रतिकृतीची विटंबना केल्याच्या निषेधार्थ शंकरनगर कडकडीत बंद

मोरे मनोहर

किनाळा :- डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा परभणी शहरातील पुतळा परिसरात असलेल्या भारतीय संविधान प्रतिकृतीची मंगळवारी विटंबना करण्यात आली या घटनेच्या जाहीर निषेधार्थ बिलोली तालुक्यातील शंकरनगर येथे संविधान प्रेमी कार्यकर्त्यांच्या वतीने दि.13 डिसेंबर रोजी शंकरनगर येथील बाजारपेठ दिवसभर कडकडीत बंद पाळण्यात आला.

परभणी शहरातील भारतीय संविधान प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्या विरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि परभणी शहरातील संविधान प्रेमी नागरिकांवर दडपशाही करून शासनाने केलेले गंभीर गुन्हे तात्काळ मागे घ्यावे यासाठी शंकरनगर येथील आंबेडकरवादी संविधान प्रेमी कार्यकर्त्यांनी शंकरनगर बंदची हाक दिली असता येथील बाजारपेठेतील किराणा दुकान, हॉटेल, कापड दुकान, पान शॉप, हेअर कटिंग सलून ची दुकाने, भाजीपाला व फळ विक्रेते यासह अनेक व्यावसायिकांनी आपापली दुकाने स्वयंपुरतीने दिवसभर बंद ठेवून पुकारण्यात आलेल्या जाहीर निषेध कार्यक्रमास आपला पाठिंबा दिला.

शंकरनगर येथे करण्यात आलेल्या जाहीर निषेध कार्यक्रमात माधवदादा वाघमारे, भास्कर भेदेकर,गंगाधर कांबळे,गौशभाई रामतीर्थकर, सुनील कांबळे, नागशेन जिगळेकर, दिपक कांबळे, इंद्रजीत डुमणे, जयदीप कांबळे आधी सह अनेक कार्यकर्त्यांनी घडलेल्या घटनेचा जाहीर निषेध करून आपल्या भावना व्यक्त करताना असे कृत्य करणाऱ्या नराधमा विरुद्ध कठोर कारवाई करावे अशी मागणी केले.

भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीचे तोडफोड करणाऱ्या विरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी, संविधान प्रेमी कार्यकर्त्याविरुद्ध करण्यात आलेले गुन्हे तात्काळ मागे घेण्यात यावे, पोलीस प्रशासनाकडून करण्यात येणारे बौद्ध वस्तीतील कोंबिंग ऑपरेशनच्या नावाखाली महिला व बालकांना विनाकारण मारहाण करणाऱ्या पोलिसा विरुद्ध कारवाई करण्यात यावी यासह संबंधित प्रकरणातील आरोपीविरुद्ध कठोर कारवाई न केल्यास येणाऱ्या काळात हे आंदोलन उग्र स्वरूपात करण्यात येईल असा इशारा मुख्यमंत्री यांना महसूल विभागाचे प्रतिनिधी म्हणून रामतीर्थ सज्जाचे तलाठी विजय पाटील जाधव आणि रामतीर्थ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप यांच्या मार्फत उपस्थित संविधान प्रेमी आंदोलकाच्या वतीने करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.

हा बंद लोकशाही मार्गाने शांततेत करण्यासाठी रामतीर्थ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली चौक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता तर हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी सुमेध, नितीन कांबळे, मुनेश्वर सोनकांबळे, मुगावकर, श्री कांबळे, केरबा भंडारे, किशनराव कांबळे, डॉ.निळकंठ कांबळे, लोहबंदे आधी सह अन्य कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

या बंद मध्ये शंकरनगर रामतीर्थ, किनाळा, हिप्परगा माळ, जिगळा केरूर, बिजूर, चिटमोगरा आधीसह परिसरातील आंबेडकरवादी संविधान प्रेमी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा निषेध डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची पूजा करून निषेध बैठक घेत दिवसभर कडकडीत बंद पाळण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker