विद्येच्या दारात लावणीचे ठेके : घुंगराळा जिल्हा परिषद शाळेच्या पटांगणातील प्रकार
अंकुशकुमार देगावकर
नायगाव : तालुक्यातील घुंगराळा येथे खंडोबा यात्रेच्या निमित्ताने गुडगुडी सारख्या जुगाराला चालना देवून बदनामी झालेली असतांनाच. संस्कृतीक कार्यक्रमाच्या नावाखाली जिल्हा परिषद शाळेच्या पटांगणात चक्क लावणीचा कार्यक्रम घेण्यात आल्याने संताप व्यक्त करण्यात येत असून. या प्रकरणी जबाबदार धरून कार्यक्रम आयोजित करणारे गाव पुढारी, ग्रामविकास अधिकारी, शाळेचे केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करून निलंबनाची कार्यवाही करावी अशी मागणी भिम आर्मीच्या वतीने करण्यात आली आहे.
नायगाव तालुक्यातील घुंगराळा येथील खंडोबा पंचक्रोशीतील आदराचे स्थान असून येथे दरवर्षी यात्रा भरते. यात्रेचे संयोजक यात्रेनिमित्त दरवर्षी अनेक उपक्रम घेतांना जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांना या कार्यक्रमाला येण्याचे निमंत्रण देत असतात आणि अधिकारीही यात्रा आणि चांगले कार्यक्रम होत असल्याने उपस्थितीही लावतात. पण संयोजक यात्रेचा खर्च काढण्यासाठी काही गैरप्रकार दरवर्षी करतात यात्र गुडगुडी जुगार चालतो. गुडगुडी चालवणाऱ्याकडून मोठी रक्कम घेतल्या जाते.
या गुडगुडी चालकाकडून आयोजक पैसे घेत असले तरी यात्रेकरुंची मात्र गुडगुडीवाले लुट करतात. या गुडगुडीमुळे यंदाच्या यात्रेत वादाची ठिणगी पडली त्यामुळे याची तालुकभर मोठ्या चवीने चर्चा होत असून आयोजनात आणि श्रेय घेण्यात पुढे असलेल्या एका पुढाऱ्याची चांगलीच शोभा झाल्याची चर्चा होत आहे.
घुंगराळ्याच्या यात्रेत गुडगुडीच्या वादाची तालुकाभर चर्चा होत असतांनाच जिल्हा परिषदेच्या शाळेच्या पटांगणात संस्कृतीक कार्यक्रमाच्या नावाखाली चक्क लावण्याचा कार्यक्रम झाल्याने तर वातावरण चांगलेच तापले असून. या प्रकरणी भिम आर्मीचे जिल्हाध्यक्ष स्वप्नील भोसीकर यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे दि. ११ डिसेंबर रोजी तक्रार केली आहे. संस्कृतीक कार्यक्रमाच्या नावाखाली घुंगराळा येथील यात्रा संयोजकांनी बाया नाचवल्याचा तक्रारीत थेट आरोप केला आहे. दिलेल्या निवेदनात लावणीच्या कार्यक्रमात प्रेक्षकांनी तुफान राडा केला.
चालु असलेल्या लावणीच्या कार्यक्रमातील नृत्यगना कडुन अश्चिल चाळे करत एका नाबालीक विद्यार्थ्यांचे चुंबन घेतल्या गेलेतरी शाळा हे विद्येचे मंदिर असून तिथे लावणी सारखे कार्यक्रम आयोजित करून विद्यार्थी जे देशाचे भविष्य आहे त्यांनी नेमका काय आदर्श घ्यावा हा प्रश्न उपस्थित केला असून. कार्यक्रम इतर ठिकाणी घेण्यास काही हरकत नव्हती परंतु अशाप्रकारचा कार्यक्रम जिल्हापरिषद शाळेत ज्यांनी आयोजन केले ते पुढारी, ग्रामविकास अधिकारी, शाळेचे केंद्र प्रमुख, मुख्याध्यापक यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करून निलंबनाची कार्यवाही वरावी ही नम्र विनंती अन्यथा भिमआर्मी संघटने तर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल असा इशाराही दिला आहे.