कुंडलवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नारायण शिंदे यांना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याकडून विशेष सेवा पदक प्रदान

कुंडलवाडी प्रतिनिधी:- गत वर्षभरापूर्वी कुंडलवाडी पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून रूजू झालेले नारायण शिंदे यांनी कुंडलवाडी पोलीस ठाण्यात रुजू होण्याअगोदर गडचिरोली या नक्षलग्रस्त भागात आपले कर्तव्य बजावले आहे. नक्षलवाद्यांच्या हिंसक व बेकायदेशीर कारवायांना परिणामकारकरीत्या आळा घालण्यासाठी नेमण्यात आलेला तीन वर्षाचा कालावधी यशस्वी पुर्ण केला असल्याने राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी विशेष सेवा पदक जाहीर केले होते.
हे विशेष सेवा आज १५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात पोलीस उपनिरीक्षक नारायण शिंदे यांना प्रदान करून गौरव करण्यात आला आहे.
यावेळी पोलीस अधीक्षक अविनाश कुमार सर, मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल आधी जण यावेळी उपस्थित होते. पोलीस उपनिरीक्षक नारायण शिंदे यांना विशेष सेवा पदक मिळाल्याने त्यांचे अनेकांनी अभिनंदन केले आहे.