राजेश्वर लापशेटवार यांची नांदेड जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेवर अशासकिय सदस्यपदी निवड

कुंडलवाडी :- शहरातील रहिवासी तथा ग्राहक पंचायत महाराष्ट्र संघटनेचे नांदेड जिल्हा सदस्य व पानसरे महाविद्यालयाचे अधिक्षक राजेश्वर शंकरराव लापशेटवार यांची नांदेड जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या जिल्हास्तरावरील समितीत अशासकिय सदस्य म्हणून दि.२३ सप्टेंबर २०२४ रोजी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातून निर्गमित झालेल्या पत्राद्वारे निवड झाली.
शासन निर्णयानुसार जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेत शासकिय व अशासकिय अशी सदस्यांची निवड करण्यात आली.या परिषदेच्या अध्यक्षपदी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत,उपाध्यक्षपदी अप्पर जिल्हाधिकारी यांच्यासह एकुण तेरा शासकिय अधिका-यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तसेच यापरिषदेत बारा अशासकिय सदस्यांची तिन वर्षाकरिता सदस्य म्हणून निवड करण्यात आली. गेली २५ वर्षांपासून राजू लापशेटवार हे ग्राहक पंचायत या संघटनेचे काम करीत आहेत.सदरिल निवडीसाठी ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ.विजय लाड व विभागीय संघटक इंजि.बालाजीराव लांडगे यांचे मोलांचे मार्गदर्शन लाभले आहे. या निवडीबद्दल लापशेटवार यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.