ताज्या बातम्यानांदेडनायगांव

तीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर डाक सेवक देविदास मोरे सेवानिवृत्त

अंकुशकुमार देगावकर

नायगाव : डाक विभागाच्या लोकल ते ग्लोबल प्रवासाचे साक्षीदार असलेले डाक सेवक देविदास मोहनराव मोरे यांनी भारतीय डाक विभागात तीस वर्षे सात दिवस सेवा करून (ता.१९) सप्टेंबर ला सेवानिवृत्त झाले आहेत.

डाक विभागाला फार जुना इतिहास आहे. फक्त आणि फक्त लोकांच्या सेवेसाठी असलेला विभाग म्हणून ओळख आहे. अनेकांच्या सुख दुःखाचा संदेश पुरवणारा दुवा यां विभागास ओळखले जात असे. देगाव येथील ब्रँच पोस्ट मास्तर यांनी डाक विभागात १२सप्टेंबर १९९५ पासून आपली सेवा करण्यास सुरुवात केली. त्यांचा जन्म २० सप्टेंबर १९६० रोजी मूळ गावी देगाव येथे झाला. त्यांच्या वयाची ६५ वर्षे पूर्ण झाल्याने वयोमामानुसार १९ सप्टेंबर रोजी ते डाक विभागातून सेवानिवृत्त झाले आहेत.

देविदास मोरे यांनी अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये सुद्धा आपली सेवा बजावत मोलाची कामगिरी करून दाखवली आहे. सुरुवातीच्या काळात येण्यासाठी कुठलेच माध्यम नसताना त्यांनी पायी प्रवास करून खेड्यापाड्यातील प्रत्येक घरापर्यंत टपाल वाटपाचे काम करत सेवा बजावली. नंतरच्या काळात त्यांनी सायकल वर प्रवास करून अनेक निराधार लोकांना आधार देण्याचे मोलाचे काम केले.

बदलत्या काळानुसार पोस्टाचे बँकेत रूपांतर झाले. यां काळात सुद्धा त्यांनी आपली सेवा अजून कठोर करत सर्व सामान्यासाठी २४ तास सेवा हा ध्यास मनी बाळगत इंडिया पोस्ट बँकेचे अनेक खाती ओपन केली अन अनेकांचे व्यवहार सुद्धा सुरळीत चालण्यासाठी चांगली सेवा बजावली. त्यामुळे त्यांच्या कार्यकाळात अनेक ब्यांकांना मागे टाकत पोस्टाचा व्यवहार पुढे नेण्यास मदत केली.

डाक विभागाच्या सुकन्या समृद्धी योजना, महिला सन्मान योजना, डाक विमा पॉलिसी, बचत ठेव योजना, जेष्ठ नागरिक योजना अशा विविध योजनेची आपल्या पोस्ट ऑफिस अंतर्गत अत्यंत चांगली सेवा देत त्यांनी डाक विभागात आपली चांगली प्रतिमा निर्माण केली आहे. त्यांच्या यां कार्याचे कौतुक सर्व स्तरातून होत असून त्यांना सेवापूर्तीच्या शुभेच्छाचा वर्षाव होताना दिसत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker