ताज्या बातम्यानांदेडबिलोली

पोलीस मित्र करंडक तालुकास्तरीय निबंध स्पर्धेची विजेता ठरली कु.वैष्णवी निवगे

विविध शाळेच्या 84 विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग...

कुंडलवाडी :- येथील पोलीस स्टेशन कुंडलवाडी यांच्या सौजन्याने पोलीस मित्र करंडक २०२४ तालुकास्तरीय निबंध स्पर्धा दिनांक १० रोजी के रामलू मंगल कार्यालय कुंडलवाडी येथे आयोजित करण्यात आले होते, या स्पर्धेत एकूण ८४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या परीक्षेचा निकाल १६ ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आला.

या स्पर्धेत आंतर भारती माध्यमिक विद्यालय बिलोली या शाळेची विद्यार्थीनी वैष्णवी विठ्ठल निवगे हिने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तर द्वितीय पुरस्कार विजेती कु.आरती बालकिशन मोकळे ( कै. गंगाबाई पोतन्ना सब्बनवार माध्यमिक हायस्कूल, कुंडलवाडी) व तृतीय पुरस्कार विजेती कु.महादेवी दत्ता मोरे(कै. गंगाबाई पोतन्ना सब्बनवार माध्यमिक हायस्कूल कुंडलवाडी ) विजेती ठरली तसेच उतत्तेजनार्थ विशेष प्रोत्साहन पारितोषिक वरद बालाजी येमेकर (के.रामलू पब्लिक स्कूल कुंडलवाडी), दत्तप्रसाद प्रकाश गंगुलवार( मिलिंद विद्यालय कुंडलवाडी), मजगे अंजली गोपीनाथ ( महर्षी कर्वे विद्यालय डोणगाव खुर्द) वरील विद्यार्थी यशस्वी ठरले.


नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या संकल्पनेतून व पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांच्या विशेष उपक्रमा अंतर्गत व धर्माबाद उपविभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत संपते यांच्या मार्गदर्शनाखाली कुंडलवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक भागवत नागरगोजे, पोलीस उपनिरीक्षक नारायण शिंदे व पोलीस स्टेशन कुंडलवाडी यांच्यातर्फे पोलीस मित्र करंडक तालुकास्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या तालुकास्तरीय निबंध स्पर्धेची सुरेख परीक्षण प्रा.डॉ.माधव हळदेकर व डॉ.बोधनकर नरेश देविदास यांनी केले आयोजन समितीत दत्ता हमंद, करण समेटवार, जयराज कंपाळे यांनी काम पाहिले बक्षीस वितरण सोहळा लवकरच मान्यवराच्या हस्ते आचारसंहितेनंतर घेण्यात येईल असे सांगण्यात आले या नावीन्यपूर्ण उपक्रमाबद्दल जनतेतून पोलीस स्टेशन कुंडलवाडी चे कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker