क्राईमताज्या बातम्यानायगांव

रातोळीच्या हायप्रोफाईल जुगार अड्ड्यावरील कारवाई संशयाच्या भोवऱ्यात : जुगारी 29 रक्कम फक्त 2 लाख 68 हजार व तीन वाहणे जप्त

अंकुशकुमार देगावकर

नायगाव : तालुक्यातील रातोळी येथे हाय प्रोफाइल जुगार अड्ड्यावर बिलोली उपविभागीय अधिकाऱ्यांच्या पथकाने धाड टाकून 29 जुगाऱ्यांना अटक केली. मात्र रक्कम 2 लाख 68 हजार सापडली आणि तीन चार चाकी वाहणे व एक दुचाकी जप्त केल्याने कारवाई बद्दलच संशय निर्माण झाला आहे. या कारवाईत अधिकाऱ्यांनी हात मारल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आहे.

बिलोली उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याच्या नेतृत्वात दि. 6 रोजी गुरुवारी 3.45 वाजताच्या दरम्यान तालुक्यातील रातोळी येथील एका पत्र्याच्या शेडमध्ये सुरु असलेल्या हाय प्रोफाइल जुगार अड्ड्यावर धाड मारली. यावेळी अंदर बाहेर खेळणाऱ्या 29 जुगाऱ्यांना अटक करण्यात आली असून. 2 लाख 68 हजाराची रोख रक्कम, तीन चार चाकी वाहणे, एक दुचाकी असा 14 लाख 58 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत बिलोली, रामतीर्थ व कुंटूर पोलीस यंत्रणेला सहभागी करुन घेण्यात आले होते पण नायगाव पोलिसांना मात्र दुर ठेवण्यात आले होते हे विशेष.

जुगार खेळणाऱ्यात जुगार खेळणाऱ्यात मुखेड, देगलूर, नायगाव व नांदेड येथील हाय प्रोफाइल जुगारी होते. यात गजानन चंद्रकांत मोरे मुखेड, आकाश व्यंकटराव दरेगावे मुखेड, शिवाजी बाबुराव पाटील मुखेड, चंद्रकात विश्वांभर पाटोदे बेरळी ता. मुखेड, व्यंकट गंगाराम देवकर देगलूर, व्यंकटी पांडुरंग शिंदे मांजरम ता. नायगाव, मनोहर शेषेराव जाधव मोकासदरा ता. नायगाव, सायलु रामलु नागशेटवार देगलुर, धर्मेद्र गंगाधर दारमवार देगलुर, धम्मपाल यादवराव कांबळे देगलुर, गणेश राजु बच्चेवाड देगलुर, सिध्देश्वर माधवरा घोणसे मुखेड, आशितोष सुर्यकांत पत्तेवार देगलुर, शेख सिध्दीक शेख मैनोदीन मुखेड, देवीदास प्रभु गोरलावाड देगलुर, सुरेश किशनराव चोंडेकर देगलुर, संगमेश्वर ऊर्फ बजरंग राजेश्वर कल्याणी मुखेड, प्रताप दशरथ रघुवंशी सिडको नांदेड, महेश नागनाथ नागमवार देगलुर, योगेश रामदास राऊलवार देगलुर, अदित्य अशोकराव देवडे देगलुर, बालाजी मल्हारी कोणकेवाड देगलुर, समीर खययुम शेख मुखेड, गंगाधर अमृत घायाळे मुखेड, गजानन श्रीनिवास इंदुरकर देगलुर, गंगाराम शिवन्न कांदमवार देगलुर, राजु उत्तम पवळे सिडको नांदेड, अमजत ताहेरखान पठाण मुखेड व इरवंत लच्छमन्ना देगलुर अदि 29 जुगाऱ्यांना अटक करण्यात आली.

रातोळी येथील ज्या विजय चंदर पाटील यांच्या शेतातील शेडमध्ये जुगार अड्डा चालत होता आणि जो हा जुगार अड्डा चालवत त्यांना मोकाट सोडण्यात आले हे विशेष. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे हा हायप्रोफाईल जुगार अड्डा होता जुगार खेळणाऱ्यात मुखेड, देगलूर, नायगाव व नांदेड येथील हाय प्रोफाइल जुगारी होते. त्यामुळे त्यांच्याकडे किमान 50 लाखाच्या वर रक्कम असण्याची शक्यता होती आणि गावातील अनेकजण असे सांगतही आहेत. परंतु पोलिसांनी फक्त 2 लाख 68 हजारच दाखवली. त्याचबरोबर चार चाकी वाहणेही फक्त तीनच दाखवली त्यामुळे मुखेड, देगलूर, नायगाव व नांदेड जुगारी येथे पायी चालत आले का अशी मिश्कील टिपणी करण्यात येत आहे.

पोलिसांनी जुगार अड्ड्यावर केलेली कारवाई योग्य असली तरी दाखवलेली रक्कम व जप्त वाहणे यामुळे सदर प्रकरण संशयास्पद ठरताना दिसत आहे. त्यामुळे या कारवाईची सखोल चौकशी झाल्यास अनेकांची अडचण वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

दोन प्रेस नोटमुळे गोंधळ वाढला…
गुन्हा दाखल झाल्यानंतर नायगाव पोलिसांनी दोन प्रेस नोट काढल्या एकात जप्त मुद्देमाल 14 लाख 58 हजार 450 एवढा दाखवण्यात आला आणि आरोपींची नावे वगळण्यात आली. तर दुसऱ्यामध्ये 16 लाख 62 हजार 150 एवढा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचे नमूद करुन आरोपींची नावे दिली. विशेष म्हणजे पहील्या प्रेसनोटमध्ये मोबाईल गायब होते तर दुसऱ्यात 26 मोबाईल जप्त करण्यात आल्याचे दाखवले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker