क्राईमताज्या बातम्यानायगांव

चाँकलेटचे अमिष दाखवून सहा वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार : नायगाव तालुक्यातील मरवाळी येथील घटना

अंकुशकुमार देगावकर

नायगाव : सहा वर्षांच्या अल्पवयीन मुलीला चाॅकलेटचे अमिष दाखवून दुकानात आत्याचार करणाऱ्य नराधमाच्या विरोधात नायगांव पोलीस ठाण्यात फोक्सोसह ऑट्रासिटी, बलात्कारचा गुन्हा दाखल करून नायगांव पोलीसांनी केली आरोपीस आटक केली आहे. एवढ्या गंभीर प्रकरणातही काहीजन दलाली करण्याचा प्रयत्न केल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.

नायगांव तालुक्यातील मरवाळी येथील महेबूब उर्फ सोहेल मुस्तफा शेख या नराधमांने किराणा दुकानात निरमा पुडा घेण्यासाठी आलेल्या सहा वर्षाच्या चिमुकलीला चाँकलेट देण्याचे अमिष दाखवून दुकानातच अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली. लैंगिक अत्याचार केल्यानंतर या नराधमांने या घटनेची कुठेही वाच्यता न करण्याची धमकी दिली. परंतु या चिमुकलीने घडलेला प्रकार घरातील नातेवाईकांना सांगितला.

मानवतेला काळीमा फासणाऱ्या या घटनेची माहिती गावात समजल्यावर या प्रकरणी नराधमाची धिंड काढण्याऐवजी गावातील काहीजन दलाली करण्याचा प्रयत्न केला. तसेच नराधमाने आपल्या मित्रमंडळाच्या ताकतीने पिडीत मुलीच्या घरावरच हल्ला करण्याचा प्रयत्न केला. अल्पवयीन मुलीवर दि. ६ जुन ला अत्याचार करण्यात आला होता पण मुलीचे वडील बाहेरगावी असल्याने दि. ८ जुनला पिडितेच्या आईने नायगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

त्याचबरोबर पिडीत मुलीनेही पोलीस निरीक्षक मारोती मुंडे यांना घडलेला प्रकार सांगितला. त्यामुळे नायगाव पोलीस ठाण्यात नराधम महेबूब उर्फ सोहेल मुस्तफा शेख याच्या विरोधात बाल लैंगिक आत्याचार प्रतिबंद कायद्या अंतर्गत व अनुसूचित जाती जमाती प्रतिबंद कायद्यानुसार नायगांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून डाॅ.अण्णाभाऊ क्रांती सेनेचे जिल्हाध्यक्ष पंडित वाघमारे, फकीरा ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रविण भालेराव, आक्षय बोयाळ, गजानन खुने, रामेश्वर डोईवाड, आदीनी पोलीस निरीक्षक मारोती मुंढे यांची भेट घेऊन आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहीजे आशी मागणी करत पिडीत कुंबांची भेट घेऊन त्यांना धीर दिला. सदरील प्रकरणाचा तपास उपविभाग पोलीस अधिकारी संकेत गोसावी देगलूर हे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker