ताज्या बातम्यानांदेडनायगांव

नायगाव येथे ओबीसींचे बुधवारी लाक्षणिक उपोषण

अंकुशकुमार देगावकर

नायगाव : ओबीसी आरक्षणाच्या बचावासाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी अंतरवली सराटीच्या वेशीवर उपोषण सुरू केलं आहे. या उपोषणाला पाठींबा म्हणून नायगाव येथे दि.१९ ला एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे.
लक्ष्मण हाके यांचं हे उपोषण अंतरवली सराटीच्या वेशीवरील वडीगोद्री गावात सुरू आहे. हाके हे मागासवर्गीय आयोगाचे माजी सदस्य आहेत. त्यांनी उपोषण सुरू केल्यानंतर वडीगोद्रीत ओबीसींचे नेते, कार्यकर्ते आणि सामान्य लोक एकवटताना दिसत आहे.

आमच्या आरक्षणाला धक्का लागू नये. आमच्या आरक्षणात कुणालाही वाटेकरी करू नये ही आमची त्यांची आहे. जोपर्यंत राज्यपालांची लेखी हमी मिळत नाही, तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही, असं हाके यांनी म्हटलंय. मराठ्यांच्या स्वतंत्र आरक्षणाला आमचा कोणताही विरोध नाही. पण आमच्या आरक्षणात कुणीही वाटेकरी नको असं त्यांचं म्हणणं आहे.

आरक्षणाच्या बचावासाठी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचे गेल्या पाच दिवसांपासून हे उपोषण सुरू आहे.
लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे या दोघांनीही गेल्या पाच दिवसांपासून पाण्याचा थेंबही घेतलेला नाही. पाच दिवसात सरकारचा कोणताही प्रतिनिधी या आंदोलनाकडे फिरकला नव्हता. सरकारने या आंदोलनाची दखलही घेतली नव्हती. त्यामुळे ओबीसी समाजात असंतोष पसयला आहे. या अमरण उपोषणाला पाठिंबा म्हणून नायगाव येथे दि.१९ ला एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात येणार असल्याचे निवेदन नायब तहसीलदार संजय देवराये यांना देण्यात आले.

यावेळी विठ्ठल बेळगे, राजु बेळगे, माधव चिंतले, सुभाष चुटेवाड, गणेश नायगावकर, बाळु गायकवाड, साईनाथ चनावार, निळकंठ ताकबीडकर, संभाजी खडके, गोविंद टोकलवाड, यांच्यासह ओबीसी समाजाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker